HW News Marathi
महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पायदळी तुडवण्याचा औरंगाबादेत प्रकार उघडकीस

बीएस-III मानकाच्या दुचाकी खपविण्यासाठी भरघोस सवलत

सर्वोच्च न्यायालयाने जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देत प्रदूषण वाढविणाऱ्या भारत स्टेज-III (बीएस-III) मानक असलेल्या वाहनांच्या विक्रीवर एक एप्रिलपासून बंदी घातली आहे, असे असताना औरंगाबादमधील वाहन कंपन्यांनी भरघोष सवलती देऊन ही वाहने खपविण्याचा प्रकार सुरू केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा एकप्रकारे अवमान असल्याचे स्पष्ट होत आहे.

देशभरामध्ये बीएस थ्री मानकाची आठ लाख वाहने असून ती भंगारात काढण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परंतु ही वाहने सवलतीच्या दरात विकण्यासाठी कंपन्यांनी ऑफर दिली आहे. ही वाहने दोन दिवसांत बंद होणार असल्याचे ते विकून नफा कमविण्याचा प्रकार औरंगाबाद सुरू आहे. बीएस-III मानकाच्या दुचाकीवर तब्बल 18 हजार रुपयांपर्यंत तर चारचाकीवर 80 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिल्यामुळे ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र होते.

सुप्रीम कोर्टाने देशभरात बीएस-III मानक असलेल्या वाहनांच्या विक्री आणि नोंदणीवरील बंदीचा निर्णय गुरुवारी दिला आहे. याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2017 पासून होणार आहे. त्यामुळे औरंगाबादसह, नाशिक, पुणे, नागपूर आणि देशभरात बीएस-III मानक असलेल्या वाहनांच्या डीलर्सनी वेगवेगळ्या स्कीम्स आणल्या आहेत. वाहनांच्या किमती अगदी 3 हजारांपासून ते 18 हजारांपर्यंत कमी केल्या आहेत. 31 मार्चपर्यंतच ही वाहने घेता येणार आहेत. त्यामुळे आज आणि उद्या रात्री उशिरापर्यंत शोरूम्स उघडी ठेवली जाणार आहे. सोशल मीडियावर ही माहिती फिरत असल्याने ग्राहकांनी शहरातील सर्वच वाहनांच्या शोरूम्सकडे धाव घेतली आहे.

बीएस म्हणजे भारतस्टेज. वाहनांत इंधनामुळे होणाऱ्या प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी मानक ठरवले जातात. नव्या मानकांनुसार इंधनही बदलते. सध्या भारतात बीएस-IV मानक सुरू आहे. केंद्र सरकारने जानेवारी 2014 च्या अधिसूचनेत कंपन्यांना बीएस-IV मानक लागू करण्याचे निर्देश दिले होते. त्यात नवीन नियम एप्रिल 2017 पासून लागू करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले होते.

बुकींग कॅन्सल, कॅश देणाऱ्यांना प्राधान्य

ज्यांनी यापूर्वी बुकींग केली होती आणि त्यांना वाहन 1 एप्रिलनंतर न्यायचे होते, त्यांच्या बुकींग कॅन्सल करून शोरूममालकांनी सरळ रोख रक्कम देणाऱ्यांना या गाड्या विकणे सुरू केले आहे. तेही जंबो डिस्काऊंटसह. यातून दोनच दिवस हाती असलेल्या या कंपन्यांच्या बीएस-III मानकाच्या गाड्याही खपत आहेत आणि डिस्काऊंटमुळे ग्राहकही खूश आहेत.

आदेशाची पायमल्ली

मोटार वाहन कंपन्यांनी सवलतीच्या दरात वाहने विक्री सुरू केली असली तरी ही वाहने प्रदूषणात भर टाकणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ज्या कारणास्तव या वाहनांवर बंदी घातली आहे, त्याला हरताळ फासण्याचा प्रकार नफेखोर वाहन कंपन्या करत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना

News Desk

मुंबईत ‘कोरोना’चा संसर्ग थांबविण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी वेगाने कार्यवाहीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

swarit

डिजिटल उपक्रमांना चालना मिळणार दूरसंचार पायाभूत सुविधा निर्मिती धोरणास मान्यता

News Desk