HW News Marathi
महाराष्ट्र

सोलापूरची घराणेशाही आणि वारसा .

अभिराज उबाळे

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाने कुस बदललीय अशी चर्चा सर्वत्र सुरुये . घराणेशाही , हुकुमशाही संपली आता लोकशाही आलीय . मागील वर्षी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत पंढरपूरच्या प्रशांत परीचारकानी माढ्याच्या संजय शिंदेनां सोबत घेवुन अशक्यप्राय विजय मिळवला . तेंव्हा पासुन प्रशांत मालक आणि संजय मामा हि जोडी भाजपसाठी ओपनिंग बॅट्समन ठरलेत. ( १९९३ च्या क्रिकेट विश्वचषक मधिल श्रीलंकेचे जयसुर्या आणि कालुवितरणा )जिल्ह्यातील नगरपालिका , पंचायत समिती, महानगर आणि आता पहिल्यांदाच जिल्हा परीषदेवर भाजप राज्य करणार . मुख्यमंत्र्यानी प्रशांत परीचारकानां आणि संजय शिंदेनां जिल्ह्या मोकळं रान दिलय . काहिही करा मला शत प्रतिशत भाजप द्या . त्यानुसार जा जोडगोळीने सुधाकरपंत , आमदार सिध्दराम म्हैत्रे , सिद्रामप्पा पाटील , माजी आमदार शहाजी पाटील यांच्या मार्गदर्शना खाली आणि उत्तम जानकर , राजा राऊत , समाधान आवताडे या युवकांना सोबत घेवुन सोलापूरच्या कॉंग्रेस , राष्ट्रवादीच्या गड किल्ल्यांवर हल्ले सुरु केले . या लढाईत त्यांनी मोहिते पाटलानां लक्ष केले . त्यांच्या घराणेशाही वर टीका केली . यामध्ये गल्ली पासुन दिल्ली ( छोटी बारामती ) यांची साथ सोबत मिळाली . मोहिते पाटलांच्या भांडवलावर जिल्हा परीषदेचे अध्यक्षपद बिनविरोध मिळवण्यात संजय शिंदे यशस्वी झाले . त्यानंतर सर्वानीं थेट मोहिते पाटलाना आव्हान दिले .

जिल्ह्यातील ग्रामपंचायती पासुन ते लोकसभे पर्यत मोहिते पाटील एके मोहिते पाटील होते . स्वतः राष्ट्रवादीत असताना बंधु प्रतापसिन्हानां भाजपच्या तिकीटावर खासदार केले . या घरणे शाहीचा बदला घेतला असे सर्वच आता ठासुन सांगताहेत . पण याच दरम्यान माढ्यात शिंदेच्या रुपाने दुसरी घराणेशाही बाळसं धरतेय याकडे कोणाचेच लक्ष नाहिये . माढा पंचायत समिती बेंबळे गणाचे आरक्षण इतर मागासवर्गीय (OBC ) पुरुष झाले . जिल्हा परीषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण पुरुष पडले . तेंव्हा पासुन शिंदे बंधुनी या पदांवर दावा दाखल केलता . माढा पंचायत समिती च्या सभापती पदावर आपल्या मुलालाच बसवायचे म्हनुन आमदार बबन शिंदेनी स्वतःच्या मुलाचे ओबीसी प्रमाणपत्र काढले आणि ओबीसींच्या हक्काधिकारावर पाणी फेरले . मुलगा विक्रमसिंह याला निवडुन आणून पंचायत समिती सभापती केले . घराणेशाही बद्दल बोलताना आपण एका मागासवर्गीय समाजावर अन्याय करतोय असे आमदार बबनदादानां वाटले नाही . उलट त्यांनी याचे समर्थन करत आम्ही देखिल ओबीसीचं आहोत असे ठासुन सांगितले . याच निवडनुकित भावाच्या मुलाला देखिल पंचायत समिती सदस्य केले . रणजित या मोठ्या चिरंजीवाला देखिल जिल्ह्या परीषदेवर पाठवले . संजय शिंदेनां जिल्हा परीषद अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसवायचे यासाठी जुळणी सुरु केली . आणि अखेर संजय शिंदे बिनविरोध अध्यक्ष झाले . ( कायदेशीर रीत्या हक्काचे एक ही मत नसताना . शिंदे अपक्ष आहेत . ) आता सुरु झाले की मोहिते पाटलांची घराणेशाही आम्ही संपवली . माढ्यांच्या या शिंदेचा विचार केल्यास तालुक्यात साखर कारखाने , सुतगिरणी , बॅंक , जिल्हा बॅंक , पंचायत समिती , बाजार समिती , देखरेख संघ यावर शिंदे कुटुंबाचीच सत्ता आहे . आता जिल्ह्याचे राजकारण अकलुज वरुन नाहितर माढ्यातुन चालणार . प्रश्न असा पडतो की घराणेशाही संपवन्यास निघालेल्या या लढवय्यानां माढा पंचायत समितीच्या सभापती पदी ओबीसी मिळाला नाहि ? जिल्हा परीषदेसाठि दुसरा चेहरा ( संजय मामा सोडुन ) मिळाला नाहि ? किंगमेकर होता होता स्वतः किंग होण्यासाठीची धडपड आहे . ज्याकाळात मोहिते पाटील बोले आणि जिल्हा हाले अशी परीस्थिती होती . तेंव्हा हे पुढारी त्यांच्या हा ला हा मिळवत . त्यांचा वेळी विरोध केला असता तर ? असो २००९ नंतर मोहिते पाटील बॅकफूटवर गेले . २०१४ च्या लोकसभा निवडनुकीत विजयदादांची दमछाक झाली पण त्यांच्या अकलुजने तारले नी खासदार केले . पण त्यांनी घराणेशाहीची री काहि सोडली नाहि . दोन जिल्हा परीषद सदस्य , पंचायत समिती सभापती आणि एक पंचायत समिती सदस्य पद पुन्हा घरातच ठेवले . माढ्याच्या शिंदे बंधुन्ही तेच केले . एक घराणेशाही संपली आणि दुसरींने जन्म घेतला . भविष्यात दुसरा संजय शिंदे जिल्ह्यात तयार झाल्यासनवल वाटायला नको . पण घराणेशाही कोणतेही असो खांद्यावर झेंडा घेवुन “विजय असो ” चा नारा देणारे चेहरे मात्र तेच असणार आहेत . शिंदे बंधु घराणेशाहीचा वारसा चालवताना दिसताहेत . उत्सुकता आहे ती भविष्यातील संजय शिंदे कोण असणार याची .

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खासगी कंपनीच्या माध्यमातून सदाभाऊ इस्त्राईलच्या दौऱ्यावर

News Desk

उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडी रद्द करून १२ नोव्हेंबर पर्यंत ईडी कोठडी सुनावली

News Desk

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन’

News Desk