HW News Marathi
महाराष्ट्र

सोलापूरात वीजेसाठी शेतकऱ्याचा टॉवरवर ‘संघर्ष’

वीजे कनेक्शन नसल्यानं शेतकऱ्याचं शोले स्टाईल आंदोलन

अभिराज उबाळे

पंढरपूर – नदीला पाणी असूनही वीज वितरण कंपनीने डीपी बसवण्यात टाळाटाळ केल्यानं संतप्त शेतकऱ्यानं टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.

मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील शेतकरी अनिल पाटील यांच्या शेतातील डीपी जळाल्यानं त्यांना पिकाला पाणी देणं मुश्कील झालंय. वारंवार विनंत्या करूनही वीज वितरण कंपनीनं पाटील यांच्या शेतात डीपी दुरूस्त करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळं संतप्त झालेल्या अनिल पाटील यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील टॉवरवर चढून आंदोलन सुरू केलंय. जानेवारी 2017 मध्ये या परिसरात डीपी बसवण्यात आला होता. त्याच दरम्यान नदीला पाणी आलं मात्र, डीपी नसल्यानं पाटील यांना पिकाला पाणी देणं शक्य होत नाही. नदी किंवा कालव्याला पाणी आले की वीज बंद केली जाते. मात्र, हे पाणी आटल्यानंतर वीज पुरवठा पुर्ववत सुरू होतो. या नदीचं पाणी आटल्यानंतरही वीज पुरवठा पुर्ववत झालेला नाही. त्यामुळं अनिल पाटील यांनी हे आंदोलन सुरू केलंय. आपली मागणी मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा पाटील यांनी दिलाय. दोन दिवस झाले विरोधी पक्षाची संघर्ष यात्रा सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे. मात्र, अद्याप कुणीही अनिल पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शांत राहूनही चांगले काम करता येते, त्यासाठी घसा फोडण्याची गरज नसते

News Desk

प्राचार्य चव्हाणांच्या निलंबनासाठी विद्यार्थ्यांचं उपोषण

News Desk

६ हजार ग्रामपंचायतींमध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्रे! – दादाजी भुसे

Aprna