HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

कोरोनाशी लढण्यासाठी १ लाख ७० हजार कोटींची घोषणा | निर्मला सीतारामण

नवी दिल्ली | केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत कोरोनाशी लढण्यासाठी १ लाख ७० हजार कोटींची घोषणा केली आहे. गरीबांना अन्नसुरक्षाही देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.  त्याशिवाय थेट खात्यात रक्कम जमा करणार त्यामीळे लोकांना घरात कॅश ठेवण्याची गरज नाही. लॉकडाऊनच्या काळात एकही व्यक्ती उपाशी राहू नये याची काळजी आम्ही घेऊ असे आश्वासनही निर्मला सीतारामण यांनी दिले.

देशातील ८० कोटी गरीबांना लाभ मिळणार. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत  पुढील ३ महिन्यांसाठी मोफत गहू, तांदूळ मिळणार, ५ किलो गहू किंवा तांदूळ, १ किलो डाळही दिली जाणार असल्याची घोषणाही केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ५० लाखांचा आरोग्यविमा घोषित केला आहे.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीशी संबंधित नसलेले विषय लोकांसमोर मांडतात

News Desk

महाराष्ट्रात युतीसाठी झुकणार नाही !

News Desk

उस्मानाबादचे टपाल कार्यालय लातूरला स्थलांतरित

News Desk