HW News Marathi
महाराष्ट्र

बोरघाटात विचित्र अपघात, १० गाड्या एकमेकांना धडकल्या 

पुणे | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात येथे एक अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सुमारे १० वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात घडला. भरधाव वेगात जाणाऱ्या एका आयशर टेम्पोचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या रोपला तो धडकला. त्यामुळे त्याच्या पाठोपाठ वेगाने आलेली वाहने एकामेकांवर धडकली. हा अपघात ५ कार, ४ ट्रक आणि एका टेम्पो समाविष्ठ होता.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बोरघाटात सकाळी ६ वाजता एक ट्रक आणि कंटेनर यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला. ही वाहने बाजूला काढण्याचे काम सुरु असल्याने महामार्गावरील एक लेन बंद ठेवण्यात आली होती. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील या विचित्र अपघातात काही गाड्यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“दरेकरांचं जाकिट बघून कोरोना म्हटला असेल जाकीटातून कुठे आत शिरु” -अजित पवार

News Desk

भुजबळ आधी म्हणाले ओबीसींचं नेतृत्व तुम्ही करा, आणि आता थेट फडणवीसांच्या भेटीला

News Desk

अादिवासी भागातील मुलांनी अनुभवली सचिनची १०,००० धावा केलेली बॅट

News Desk