HW News Marathi
महाराष्ट्र

12 वर्षीय मुलगी 27 आठवड्यांची गर्भवती

मुंबई- तब्बल 27 आठवडे गर्भवती असलेल्या 12 वर्षीय मुलीने गर्भपातासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मुंबईतील चारकोप परिसरात राहणारी ही पीडिता असून याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध बलात्कार आणि पोस्कोअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

भारतात २० आठवडय़ांपर्यंत गर्भपात करण्याची परवानगी असल्याने गर्भधारणेस त्याहून अधिक काळ झालेल्या मुंबईतील ९ गर्भवतीनीं सर्वोच्च न्यायालयात गर्भपाताच्या परवानगीसाठी धाव घेतली होती. यापैकी सात महिलांनाच गर्भपाताची परवानगी देण्यात आली असून इतर दोन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गर्भपातास नकार दिला होता.

दरम्यान, बुधवारी चारकोप परिसरातील एका १२ वर्षांची अल्पवयीन मुलगी रुग्णालयात तपासणीसाठी गेली असता ती २७ आठवडय़ांची गर्भवती असल्याची बाब उघड झाली. या घटनेमुळे तिच्या पालकांना मोठा धक्का बसला असून बुधवारी त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

दरम्यान, अनेकदा गर्भातील व्यंग २० आठवडे उलटून गेल्यानंतर लक्षात येतो. त्यामुळे २० आठवडय़ांनंतरही गर्भपाताची परवानगी देण्याची आवश्यकता आहे, असे मालाडचे क्लाऊडनाईन रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल दातार यांनी सांगितले. चारकोपच्या प्रकरणात १२ वर्षांची अल्पवयीन मुलगी २७ आठवडय़ांची गर्भवती आहे. तिचा तातडीने गर्भपात करणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका करणे, राज्य सरकारच्या समितीकडून त्या मुलीची वैद्यकीय तपासणी व तिचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करणे या प्रक्रियेत बराच वेळ वाया जातो आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्यासाठी सर्वच कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते, असेही डॉ. दातार यांनी सांगितले. अल्पवयीन मुलीची प्रसुती करणे धोक्याचे असते. त्यामुळे मुलीच्या भविष्याचा विचार करता गर्भपात हाच पर्याय आहे, असे स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. अश्विनी भालेराव गांधी यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार हे महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्व ,ऊर्मिला मातोडकरांकडून शुभेच्छा!

News Desk

साताऱ्याची यात्रा ही माझ्यासाठी तीर्थयात्रासारखी !

News Desk

सावधान! सरकार तुमचे व्हॉटसअप चॅट, एसएमएस वाचतंय, जितेंद्र आव्हाडांचा केंद्राला निशाणा

News Desk