HW News Marathi
महाराष्ट्र

‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला दोन दिवसांत १२ कोटी ५० लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

मुंबई | संपूर्ण जगभरात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. यात भारत देखील अपवाद राहिलेला नाही. भारतात कोरोनाबाधितांचा आकड १४२४ पार गेला आहे. देशातील महाराष्ट्र राज्यात कोरोना २०० पार गेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थानी आपले योगदान द्यावे असे आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहानाला उत्तम प्रतिसाद मिळत असून गेल्या दोन दिवसांत १२ कोटी ५० लाख रुपये या खात्यात जमा झाले आहेत. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.

याशिवाय २० तारखेपासून आजतागायत सीएसआर निधीतून तसेच देणगी स्वरुपात कोरोना आपत्ती व्यवस्थापनाकडे अनेक उद्योग व संस्थानी मदत देणे सुरु केले आहे. इंडियन ह्यूम पाईप, रायचंद ट्रस्ट, वालचंद ट्रस्ट, इंडियनऑइल, आयसीआयसीआय, बादल मित्तल ग्रुप, फ़ार्म इझी, महानगर गॅस, सिप्ला फॉउंडेशन, गोदरेज ग्रुप, जेएम फायनांशियल, मराठा चेंबर ऑफ़ कॉमर्स, सत्व कंसल्टिंग, पल्लवी चोक्सी, एमएसईडीसीएल, इंडियन मर्चेंट्स चेंबर, बलदेव अरोरा ट्रस्ट, एशियन पेंट्स, हायकेल इंडिया या संस्थानी मास्क, व्हेन्टीलेटर, पीपीई किट्स , आरटी- पीसीआर मशीन, मल्टी लोडर रेडिओग्राफी सिस्टिम, मोटराइज्ड बेड्स, फ्रीजर अशी सुमारे 10 कोटी रुपयांची विविध उपकरणे व साहित्य देऊ केले आहे.

उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनीमुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19 या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. सदर देणग्यांना आयकर अधिनियम १९६१ च्या ८० (जी) नुसार आयकर कपातीतून १०० टक्के सूट देण्यात येते.

मुख्यमंत्री सहायता निधीच्या माहिती

  • Chief Minister’s Relief Fund-COVID 19
  • Savings Bank Account number 39239591720
  • State Bank of India,
  • Mumbai Main Branch,
  • Fort Mumbai 400023
  • Branch Code 00300
  • IFSC CODE- SBIN0000300

मुख्यमंत्री सहायता निधीची मराठी माहिती

  • मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
  • बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
  • स्टेट बँक ऑफ इंडिया,
  • मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
  • शाखा कोड 00300
  • आयएफएससी कोड SBIN0000300

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मंदा म्हात्रेंच्या विधानावर आता चंद्रकांत पाटलांचं उत्तर! म्हणाले….’

News Desk

”जिथे विषय गंबीर तिथे मनसे खंबीर” मनसे देणार पद्मावतला पाठिंबा

News Desk

कट्टर शिवसैनिक ते मनसे जिल्हा प्रमुख प्रकाश कौडगे यांचे निधन

News Desk