HW News Marathi
Covid-19

१२ हजार ऊसतोड मजूर बीड जिल्हयात परतले, चेक पोस्टवर वैद्यकीय तपासणी करूनच जिल्हयात प्रवेश

बीड | कोरोनामुळे लॉकडाऊन कालावधीत कारखान्यांवर अडकलेल्या ल उसतोड मजुरांना स्वगृही जाण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर उसतोड मजुर जिल्ह्याच्या सिमेवर पोचले आहेत. १९ ठिकाणी जिल्हयात प्रवेश करताना संपूर्ण वैद्यकीय चेकप करूनच जिल्हयात प्रवेश दिला जात आहे, आज (२२ एप्रिल) पर्यन्त जिल्हयात १२ हजार मजूर दाखल झाले आहेत.

बीड जिल्हयात प्रवेश केल्यानंतर सामाजिक संस्थाच्या वतीने जेवण नाशता ,मास्क दिले जात आहे तसेच सर्वच चेक पोस्ट वर भारतीय जनता पार्टी जिल्हा बीड च्या वतीने जेवण आणि इतर व्यवस्था केली जात आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सूचना देत जिल्हयातील सर्व यंत्रणा सक्रिय केल्या आहेत. त्या- त्या गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा व आरोग्य सेविक, पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी, कृषी सेवक, मंडळ कृषी अधिकारी व इतर सर्व विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे दोन उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महसूलचे नायब तहसीलदार व रोहयोच्य उपजिल्हाधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारने ‘या’ ५ योजनांसाठी १२५७ कोटी ५० लाख रुपये मंजूर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे मुंडेंनी मानले आभार

News Desk

पुण्यातील बेड्सचा प्रश्न तातडीने सुटणार, युद्धपातळीवर काम करण्याच्या महापौरांच्या सूचना !

News Desk

PM केअर फंडातून ऑक्सिजन प्लांटसाठी महाराष्ट्राला एका नवा पैसा मिळालेला नाही !

News Desk