HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेबाबत विचारलेल्या प्रश्नाला नारायण राणेंनी दिलं जबरदस्त उत्तर

नवी दिल्ली। नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारमधील दुसऱ्या टप्प्यातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ देण्यात आलीय. या शपथविधी सोहळ्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. तसंच या नेत्यांमुळेच आपण आज केंद्रीय मंत्री झाल्याचंही राणे म्हणाले. त्यावेळी शिवसेनेबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला राणे यांनी उत्तर दिलं आहे.

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर अनेक प्रसंग आले त्याबाबत काय सांगाल असं विचारल्यानंतर राणे म्हणाले की, “१९९९ ला मुख्यमंत्री झालो. त्यानंतर अनेक चढउतार आले. आता मोदींच्या नेतृत्वात हे पद मिळालं आहे. त्यांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावेन, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केलाय. तसंच शिवसेनेला शह देण्यासाठी तुम्हाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याची चर्चा असल्याचं एका पत्रकाराने विचारलं. त्यावेळी कुणाला शह देण्यासाठी की अन्य कशासाठी मला मंत्री केलं हे माहिती नाही. फक्त मंत्री केलंय एवढं नक्की”, असं मिश्किल उत्तर राणे यांनी यावेळी दिलं.

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आभारी आहे. त्यांच्यामुळेच मी आज केंद्रीय मंत्री बनलो आहे. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनात माझ्यावर जी जबाबदारी देण्यात येईल ती योग्यरित्या सांभाळेल. इतक्या वर्षाचा प्रवास दोन वाक्यात सांगणं शक्य नाही. पण आज सांगताना आनंद होतोय की, पहिल्यांदा मुंबई महापालिकेत नगरसेवक झाले. त्यानंतर आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, खासदार आणि आता केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या माध्यमातून महाराष्ट्राला न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, असं राणे म्हणाले.

निलेश राणे काय म्हणाले ?

शिवसेनेच्या विरोधात राणे यांना प्रमुख अस्त्र म्हणून वापरलं जाईल, असा सवाल पत्रकारांनी विचारला असता केंद्रीय मंत्रिपद ही एक मोठी जबाबदारी आहे. तुम्ही त्याचा राजकीय अर्थ लावत असाल. पण साहेबांन देण्यात आलेली जबाबदारी मोठी आहे. नगरसेवक ते केंद्रीय मंत्री हा प्रवास मोठा आहे, सोपा नक्कीच नाही. हे येरागबाळ्याचं काम नाही. उरला प्रश्न शिवसेनेचा तर त्यांना आम्ही किंमत देत नाही. जे मिळालं त्यात आम्ही समाधानी असल्याचंही निलेश राणे म्हणाले.

राणे म्हणजे शिवसेनेची जखम

शिवसेनेनं नारायण राणेंना मुख्यमंत्री केलं. बाळासाहेबांनी तो विश्वास दाखवला. पण बाळासाहेबांच्या हयातीतच राणेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि बाहेर पडले. उद्धव ठाकरेंची शिवसेनेत चलती सुरु झालेली होती. त्याचाच परिणाम म्हणून राणे बाहेर पडले. ते फक्त बाहेरच पडले

असते तर शिवसेना नेतृत्वाला फार वाईट वाटलं नसतं. पक्ष म्हटल्यानंतर लोक येत जात राहणार. पण राणे बाहेर पडले आणि त्यांनी कधी शिवसेनेवर तर कधी ठाकरे कुटुंबावर थेट हल्ला चढवला. बाळासाहेबांचा त्यांनी आदर राखला पण उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर मात्र एकेरी भाषेत हल्ले चढवले. आजही राणेंचा, त्यांच्या मुलाचा उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्यावर टिका केल्याशिवाय

दिवस जात नाही. विशेष म्हणजे टिका करताना भाषेची कुठलीच मान-मर्यादा पाळलेली नसते.राणे म्हणजे शिवसेनेची भळभळती जखम आहे.

शिवसेनेच्या जखमेवर मीठ

कोकण हा शिवसेनेचा बेस आहे. कोकणातून मुंबईत आलेला मराठी माणूस पक्का शिवसैनिक असतो. राणेंमुळे मात्र त्यात विभागणी झालीय. सिंधुदुर्गात शिवसैनिक आणि राणे समर्थक यांचे अधूनमधून राडे होत असतात. आता तर राणेंना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यामुळे संघर्ष तीव्र होऊ शकतो. राणे म्हणजे शिवसेनेची भळभळती जखम आहे. राणे भाजपचे आधी सहयोगी नेते झालेआणि नंतर ते भाजपच्याच कोट्यातून थेट राज्यसभेवर गेले. भाजपात गेल्यावर राणेंनी शिवसेना आणित्यांच्या नेत्यांवरचे एकेरी भाषेतले हल्ले आणखी तीव्र केले. अशा नेत्याला केंद्रात मंत्री केल्यामुळे हे शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं आहे. त्याची चर्चा सुरु झालीय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे हे प्रशासनासाठी जन्मले नाही, ते पक्ष चालवण्यासाठीच जन्मले- चंद्रकांत पाटील

News Desk

‘कोरोनाचे नियम पाळत ग्रामसभा घेण्यास परवानगी द्या’, शिवसेना खासदाराची राज्य सरकारकडे मागणी!

News Desk

“मला सुसंस्कृतपणा तुम्ही शिकवू नका”, पडळकरांचं थोरातांच्या मुलीला प्रत्युत्तर

Ruchita Chowdhary