HW News Marathi
महाराष्ट्र

“…नाहीतर लवकरच राणेंचीही गच्छंती होईल”, दीपक केसरकरांचा इशारा

मुंबई । शिवसेनेचे आमदार आणि नारायण राणे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी दीपक केसरकर यांनी आता राणेंना एक सल्ला दिला आहे. राणेंबाबत दीपक केसरकर म्हणाले कि, “राणेंनी आपल्या मंत्रिपदाचा वापर देशाच्या विकासासाठी करावा. नाही तर इतर मंत्र्यांची जशी गच्छंती झाली तशीच त्यांचीही गच्छंती व्हायला वेळ लागणार नाही”, अशी बोचरी टीका दीपक केसरकर यांनी केली आहे. नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर शिवसेनेकडून नेमक्या काय प्रतिक्रिया येतात याकडे सर्वांचेच लक्ष होते. त्यातच आता केसरकर यांनी डिवचल्यानंतर राणे यांच्याकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणे आवश्यक आहे.

नारायण राणे यांचे कोकणातील कट्टर विरोधक मानले जाणारे दीपक केसरकर म्हणतात की, “नारायण राणे शिवसेनेवर जी आगपाखड करतात त्यामुळेच त्यांना केंद्रांमध्ये मंत्रिपद मिळालेलं आहे. या मंत्रिपदाचा वापर त्यांनी महाराष्ट्रासह भारतातल्या जनतेसाठी करावा. देशाचा विकास करण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा इतर मंत्र्यांची जशी गच्छंती झाली तशीच गच्छंती व्हायला वेळ लागणार नाही.” दीपक केसरकर यांच्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत काय म्हणाले ?

नारायण राणे यांच्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “क्षमता पाहूनच मंत्रिपदं दिली असतील.केंद्रात पाहीलं, केंद्रात सुद्धा अनेक जुने जाणकार बाजूला आहेत. बाहेरुन आलेली अनेक प्रमुख लोकं आहेत, ज्यांना जबाबदाऱ्या दिल्या आहेत, पण ते त्यांच्यामध्ये सक्षमता पाहून दिलं असावं. नविन मंत्र्यांना आम्ही शुभेच्छा देतो. त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये योगदान द्यावं. विशेषत: आरोग्यमंत्री आहेत, त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे, नारायण राणे यांच्या रोजगार निर्माण करण्याची, लहान उद्योगांना जो पूर्णपणे या काळामध्ये मरुन पडला आहे, त्यांना संजिवनी देण्याचं काम राणेंनी करावं,” असं संजय राऊत म्हणाले. तसेच, “कपिल पाटील आणि भारती पवार राष्ट्रवादीचं प्रॉडक्ट आहेत. नारायण राणे शिवसेना काँग्रेस करत भाजपमध्ये गेले आहेत. हे पाहिल्यावरती मुळ चेहरा मंत्रिमंडळाचा पूर्णपणे राष्ट्रवादी शिवसेनेचाच आहे,” अशी खोचक प्रतिक्रिया देखील संजय राऊत यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणुकाच इंधन दरवाढ रोखू शकतात; सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारवर टीका

Aprna

फडणवीस म्हणतात, “मुख्यमंत्री महोदय तुमच्या मंत्र्यांना आवरा”

News Desk

‘एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये’, विजय वडेट्टीवारांची सूचना

News Desk