HW News Marathi
महाराष्ट्र

‘एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये’, विजय वडेट्टीवारांची सूचना

मुंबई | जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झाला होतं. या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. शेती पिकांसोबतच इतर बाबींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, हे लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने काटेकोरपणे पंचनामे करावेत. एकही व्यक्ती मदतीपासून वंचित राहू नये याची खबरदारी घ्या, अशा विजय वडेट्टीवार यांनी दिल्या आहेत.

नुकसानीची माहिती शासनाला सादर करावी

केलेल्या पंचनाम्यांची शहनिशा करण्यात यावी. शेती, घरे, पशुधन, फळबागा, शेत जमीन खचलेली क्षेत्र, दरडी कोसळेलेल्या शेत जमिनी, ग्रामीण रस्ते, शाळा, शासकीय इमारती, पूल, कॅनॉल, फुटलेले तलाव याबाबत तसेच इतर बाबींच्या नुकसानीची माहिती शासनाला सादर करावी, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

मृत व्यक्तींच्या वारसदारांना तातडीच्या मदतीचे वितरणही

ज्या ठिकाणी तातडीने मदत आवश्यक आहे अशा वेळी राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची मदत तातडीने घेण्यात यावी. आपत्तीमध्ये मृत व्यक्तींच्या वारसदारांना तातडीच्या मदतीचे वितरणही तात्काळ करण्यात यावे. दरड कोसळण्याची अथवा अशी ठिकाणे असतील अशा परिसरातील नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. कोरोना परिस्थितीत स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेवून या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

एनडीआरएफच्या निकषात वाढ करू

‘एनडीआरएफ’ च्या मदत निकषात वाढ करण्याबाबत राज्य शासनाकडून पाठपुरावा सुरू आहे. शासनाकडून जुलै महिन्यात जाहीर केलेल्या मदतीचे वाटप करण्याबाबतही लवकरच निर्णय होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. मदत व पुनर्वसनचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी विभागाने करावयाच्या कार्यवाहीची माहिती बैठकीत दिली.

कोणतीही नुकसानग्रस्त व्यक्ती मदतीपासून वंचित राहू नये

विजय वडेट्टीवार यांनी काल राज्यातील अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या जिल्ह्यांचा आढावा दूरदृश्यप्रणालीव्दारे घेतला. यावेळी मदत व पुनर्वसनचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्याबरोबरच राज्यातील सर्व जिल्ह्यांचे विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी यावेळी दूरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थित होते.राज्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अजूनही पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज रोजी जिल्हा प्रशासनांकडून पंचनामे केल्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसानीचे आकडे वाढत आहेत. विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसिलदार यांनी काही प्रातिनिधीक ठिकाणी जावून पंचनामे केले आहेत अशा ठिकाणाची पाहणी करावी. कोणतीही नुकसानग्रस्त व्यक्ती मदतीपासून वंचित राहू नये ही खबरदारी घ्यावी, असं वडेट्टीवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सावधान! स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंगच

News Desk

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसेना आणि भाजप युती होऊ शकते, गिरीश बापटांचं वक्तव्य

News Desk

उजनी पाणीसंघर्ष मिटला ! उजनीतून इंदापूरला पाणी नेण्याचा निर्णयच रद्द

News Desk