HW News Marathi
महाराष्ट्र

“जरंडेश्वरला किती कर्ज दिलं? EDची नोटीस का आली?” सातारा जिल्हा बँकेने दिली उत्तरे

मुंबई | जरंडेश्वर साखर कारखान्याला दिलेल्या कर्ज प्रकरणी ED कडून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस बजावण्यात आली. या कारवाईनंतर साताऱ्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी या नोटीस जारी करून खुलासा केला आहे. “ED नोटीशीसंदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका”, असे आवाहन आता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने केले आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने याबाबत आपल्या नोटिशीत म्हटले आहे कि, “बँकेला EDची नोटीस आली असून कोरेगाव येथील जरंडेश्वर शुगर्स या कारखान्यासाठी नेमके किती कर्ज वितरित करण्यात आले याबाबतचा खुलासा ED च्या नोटीस मध्ये मागवण्यात आला आहे.” जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्याधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी याबाबतचा खुलासा केला आहे.

बँकेनं जरंडेश्वरला किती कर्ज दिलं?

राजेंद्र सरकाळे यांनी अशी माहिती दिली कि, “सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं २०१७ सालापासून जरंडेश्वर कारखान्यासाठी १२८ कोटीचे कर्ज वितरीत केले आहे. कारखान्याकडे सध्या ९७ कोटी ३७ लाख कर्ज शिल्लक आहे. जरंडेश्वरकडून वेळेत कर्ज फेडले जात आहे का? नेमके किती कर्ज वितरीत करण्यात आले आहे ? याविषयीची माहिती ED कार्यालयाकडून मागवण्यात आली आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सामनाच्या संपादक रश्मी ठाकरेंविरोधात नाशिक पोलिसांत तक्रार!

News Desk

राहुलजी गांधींच्या प्रतिमेला जोडे मारण्याचे आंदोलन म्हणजे हीन राजकारण! – बाळासाहेब थोरात

Aprna

“मी कुणालाही शुर्पणखा म्हटलेलं नाही”, चित्रा वाघ याचं स्पष्टीकरण!

News Desk