HW News Marathi
महाराष्ट्र

‘तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक’,फडणवीसांनी हात झटकले !

मुंबई | देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने कोरोना लस घेतलेला एक फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आणि टिका व्हायला सुरूवात झाली. लस उपलब्ध होत नसल्याने अनेक लसीकरणं केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली असताना काल (१९ एप्रिल) विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याच्या फोटोची चर्चा रंगली होती. यामध्ये तन्मय फडणवीस लसीचा डोस घेताना दिसत आहे. तन्मय फडणवीसने नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये (NCI) लसीचा दुसरा डोस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. वाद झाल्यानंतर त्याने ही पोस्ट डिलीट केली.

देशभरात ४५ वर्षाच्या पुढील लोकांना लसीकरणासाठी परवानगी असतानाही पात्र नसणाऱ्या तन्मय फडणवीसला लस कशी काय देण्यात आली असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस यांनी करोना लसीकरणासाठी असणाऱ्या नियमांचं पालन केलं पाहिजे याबाबत दुमत नसून कोणालाही चुकीच्या पद्धतीने ते करण्याची परवानगी देता कामा नये असं फडणवीसांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ”तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण जर नियमांचे उल्लंघन झालं तर हे अयोग्य आहे”.

पुढे ते असंही म्हणाले की, पात्र नसल्याने माझ्या पत्नी आणि मुलीलाही लस मिळालेली नाही. प्रत्येकाने नियमांचं पालन केलं पाहिजे हे माझं ठाम मत आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पुतण्यामुळे अडचणीत आलेल्या काकांनी सरळ या प्रकरणातून हात झटकलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता नेमकी कोणत्या निकषांच्या आधारे तन्मय फडणवीस यांनी लस घेतली याची तपासणी होणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

रुग्णालयाने काय स्पष्टीकरण दिले?

दरम्यान नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक शैलेश जोगळेकर यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं आहे की, “तन्मय फडणवीसने आमच्याकडे लसीचा दुसरा डोस घेतला. मुंबईमधील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्याने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्याला कोणत्या निकषाद्वारे पहिला डोस देण्यात आला याची कल्पना नाही. त्याने आम्हाला प्रमाणपत्र दाखवल्यानंतर आम्ही आमच्या सेंटरमध्ये दुसरा डोस दिला आहे”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विठुमाऊली चमत्कार दाखव,हे तोंडाला पट्टी बांधून कसं जीवन जगायचं? मुख्यमंत्र्यांच साकडं

News Desk

महागाईची झळ टपरीवरच्या चहाला; राज्यातील चहा 2 रुपयाने महागला

Aprna

आरोग्य विभागात २५ हजारांहून अधिक रिक्त पदे भरणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती

swarit