HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेस कार्यकर्त्यांचे वजन बैलाला झेपेना, बैलगाडीतून कोसळले भाई जगताप!

मुंबई। दररोज होत असलेल्या इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे वजन सहन न झाल्याने मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह सगळेच खाली बैलगाडीवरुन खाली कोसळले. काँग्रेसने गॅस, पेट्रोल आणि डिझेलमध्ये दररोज होणाऱ्या दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुंबईत बैलगाडी मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र एकाच वेळी अनेक कार्यकर्ते बैलगाडीत गाडीत चढल्याने एका क्षणात ते रस्त्यावर खाली पडले.

देशात एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज वाढतच आहेत. सामान्य जनतेमध्ये असलेल्या संतापाला वाचा फोडण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं मुंबईत बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी एक बैलगाडी आणण्यात आली. त्यात उभे राहून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली. ‘देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो’, अशा घोषणा कार्यकर्ते देत होते. मात्र त्याचवेळी दोन बैलांपैकी एका बैलाला त्यांचे वजन सहन करणे कठीण झाले. आणि काहीवेळाने हा बैल या गाडीपासून वेगळा झाला आणि बैलगाडी पलटी झाली. त्यामुळे बैलगाडीत उभे असलेले काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह सर्व कार्यकर्ते एका क्षणात गाडीतून रस्त्यावर पडले. या अपघातात कुणालाही गंभीर इजा झाल्याची माहिती नाही. मात्र कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर कोसळल्याने काहीजणांना किरकोळ मुका मार तर काहीजणांना खरचटल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय शिरसाट नाराज? ट्विट मध्ये उद्धव ठाकरेंचं उल्लेख

Seema Adhe

मुंबईत चोरीचे प्रकरण उघडकीस, गुन्हे शाखेच्या युनिट ३ ची उल्लेखनीय कामगिरी

Aprna

“अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरेंना जे जमले नव्हते, ती किमया…” तानाजी सावंतांचे मोठे विधान

Aprna