HW News Marathi
महाराष्ट्र

जाधवांनी विधानसभाध्यक्ष व्हावे, पण निष्पक्ष काम करावे! फडनविसांचा टोला

नागपूर। भास्कर जाधव यांना विधानसभा अध्यक्ष पदासाठी शुभेच्छा आहे, मात्र पदावर गेल्यावर त्यांनी किमान निष्पक्षपणे काम करावे अशी अपेक्षा आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. याशिवाय इतरही विषयांवर फडणवीस यांनी यावेळी वक्तव्य केले. देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये दाखल झाल्यानंतर माध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष पदाबाबत त्यांनी महविकास आघाडीवर टीकास्र सोडले. महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये अध्यक्ष पदाबद्दल एकमत राहिले असते तर आतापर्यंत विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक झाली असती. एकमत नाही म्हणून आतापर्यंत तारीख जाहीर केली नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.

केंद्रीय मंत्री मंडळात खा. प्रीतम मुंडे यांना सामावून घेतलं नसल्याने नाराज मुंडे समर्थकांकडून भाजपमधील पदाचा राजीनामा सत्र सुरू केले आहे. याबाबत फडणवीस यांना विचारले असता, ‘याबाबत काल पंकजा ताईंनी स्पष्टीकरण दिले, मी दिले, मला वाटते त्यानंतर काही बोलायची गरज नाही’, त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबईत सुरु असलेल्या काँग्रेसच्या आंदोलनावरही फडणवीस यांनी शरसंधान साधले आहे. या आंदोलनामध्ये सरकारचा निषेध करण्यासाठी आणलेली बैलगाडी अचानकपणे तुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप बैलगाडीवरुन जमिनीवर कोसळले. या घटनेनंतर ‘राहुल गांधी यांना राष्ट्रीय नेते म्हणल्याचे कदाचित बैलांना ही आवडलेले नाही. त्यामुळे मुंबईत काँग्रेस आंदोलनात बैल पळून गेले’, अशी खोचक टीका फडणवीस यांनी काँग्रेस आंदोलनावर केली आहे.

भाई जगताप जमिनीवर कोसळले

या बैलगाडीवर उभे राहून काँग्रेस कार्यकर्ते तसेच भाई जगताप केंद्र सरकारविरोधात घोषणा देत होते. तसेच “देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो !” अशासुद्धा घोषणा दिल्या जात होत्या. मात्र, क्षमतेपेक्षा जास्त लोक या बैलगाडीवर चढल्यामुळे ती जागेवरच तुटली. परिणामी कांग्रेस कार्यकर्तेही खाली कोसळले. बैलगाडीमध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप हेसुद्धा उभे होते. बैलगाडी अचानकपणे तुटल्यामुळे तेसुद्धा जमिनीवर कोसळले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीएमसीच्या प्रभागात वाढ, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

News Desk

राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांच्या पॅनेलने कुटासा गावात १० जागा राखल्या

News Desk

“पोहरादेवीची ‘पूजा’ तरी कशी पावेल, जर चव्हाणांच्या पूजाचं काय झाल ते सांगितलं नाहीत तर?” भाजपचा सवाल  

News Desk