HW News Marathi
महाराष्ट्र

अमोल मिटकरींना भाषण सुरु असतांनाच अर्धांगवायूचा सौम्य झटका!

अकोला। राष्ट्रवादी सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीच्या विदर्भ संयोजक गायिका वैशाली माडे यांचा अकोला दौरा होता. जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या बिफॉर्म कॉलेजमध्ये हा कार्यक्रम सुरू होता. अमोल मिटकरी यांनी मार्गदर्शन केल्यावर शेवटी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची माझी मैना गावाकड राहिली,माझ्या मनाची होतीया काहीली ही छक्कड खड्या आवाजात गायला सुरुवात केल्यावर काही क्षणात त्यांचा आवाज चिरका व्हायला लागला, तोंड किंचित वाकडे होत असल्याची जाणीव उपस्थित काहींना होताच तात्काळ त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी हे काल दुपारी हिंगणा येथील पक्षाच्या कार्यक्रमात बोलत असताना,अचानक अर्धांग वायूचा सौम्य झटका आल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं त्यानंतर मात्र, अमोल मिटकरी यांना तात्काळ आयकॉन हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती स्वता:  मिटकरी यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सामना वृत्तपत्र कधी वाचलेच नाही आणि आमच्या जिल्ह्यात पेपर येतही नाही – गोपिचंद पडळकर

News Desk

पवार कुटुंबात गृहकलह अजिबात नाही !

News Desk

CA परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल, आता नोव्हेंबरमध्ये होणार परीक्षा

News Desk