HW News Marathi
महाराष्ट्र

सेना- मनसे- भाजप – असा प्रवास करत सुरेश म्हात्रे काँग्रेसमध्ये स्थिरावणार

ठाणे | ठाण्यातील शिवसेना नेते सुरेश म्हात्रे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत म्हात्रे मुंबईत काँग्रेसचा झेंडा हाती धरणार आहेत. शिवसेना-मनसे-भाजप-शिवसेना त्यानंतर आता काँग्रेस असा सुरेश म्हात्रेंचा राजकीय प्रवास आहे.

शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख आणि बांधकाम, आरोग्य समितीचे सभापती सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळ्या मामा) काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. ते ठाणे जिल्हा परिषदेचे गटनेते आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत युतीमध्ये लढत असताना भाजप उमेदवार कपिल पाटील यांना उघड विरोध केल्याने त्यांना शिवसेनेतून निलंबित करण्यात आले होते. मात्र, नंतर निलंबन मागे घेण्यात आले होते.

कोण आहेत सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा?

सुरेश गोपीनाथ म्हात्रे हे बाळ्या मामा नावाने प्रसिद्ध

शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख

ठाणे जिल्हा परिषदेचे गटनेते, तर बांधकाम, आरोग्य समितीचे सभापती

२०१४ मध्ये म्हात्रेंनी मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती

पराभवानंतर आधी भाजप, नंतर पुन्हा स्वगृही शिवसेनेत प्रवेश केला होता

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार कपिल पाटील यांना उघड विरोध करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

अर्ज मागे घेत कपिल पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे शिवसेनेतून निलंबित करण्यात आले, नंतर निलंबन मागे घेण्यात आले.

शिवसेना उपनेते अशोक शिंदेही काँग्रेसमध्ये

दुसरीकडे, शिवसेनेचे उपनेते आणि माजी राज्यमंत्री अशोक शिंदेही काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. ते वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. शिवसेनेचे वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख आणि माजी खासदार अनंत गुढे आणि अशोक शिंदे यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. अशोक शिंदे यांनी मुंबईला जाऊन शिवसेना पक्षनेतृत्वाकडेही गुढे प्रकरणात न्याय मागितला होता, परंतु सेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांची दखल घेतली नसल्याचं बोललं जातं. त्यानंत अशोक शिंदेंनी शिवबंधन सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय निश्चित केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांची ईडीविरोधात हायकोर्टात याचिका!

News Desk

शिवसेना नेत्यांकडून जीवाला धोका, मुंबईतील खटले हिमाचलला हलवा, कंगना राणावतची मागणी

News Desk

माजी मुख्यमंत्र्यांचा जर एकेरी उल्लेख केला असता तर…जयंत पाटलांचा टोला 

News Desk