HW News Marathi
महाराष्ट्र

औरंगाबाद प्राणीसंग्रहालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवा, उद्धव ठाकरेंच्या सूचना!

मुंबई। औरंगाबाद महापालिकेतर्फे शहरातील मिटमिटा येथे प्राणीसंग्रहालयाचे काम सुरु आहे. या प्राणीसंग्रहालयाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी काही सूचना केल्या आहेत. त्यांनी हे प्राणिसंग्रहालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त जागेचा तसेच निधीचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी लवकरात लवकर पाठवावा, असे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज त्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी हे आदेश दिले.

महापालिकेमार्फत सिद्धार्थ उद्यानात १४ एकर जागेवर प्राणीसंग्रहालय कार्यरत असून ते मराठवाड्यातील एकमेव प्राणीसंग्रहालय आहे. येथे ससे, नीलगाय, हरिण, मोर, कोल्हे, लांडगे, तरस, सिंह, अस्वल, वाघ, हत्ती आदी वन्ययजीव आहेत. या प्राणीसंग्रहालयाला जागा कमी पडत असल्याने केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधीकरणाने दाखविलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी व मानकांनुसार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मिटमिटा येथे ४० हेक्टरवर प्राणीसंग्रहालयाचे काम सुरू आहे. या प्राणीसंग्रहालयास तसेच सफारी पार्कसाठी अतिरिक्त जागा लागणार आहे. याच विषयावर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी या बैठकीत मिटमिटा येथील प्राणीसंग्रहालय हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे अशी इच्छा उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच त्यासाठी अतिरिक्त जागा आणि निधी लागत असेल तर शासनाकडे प्रस्ताव पाठवावा असेही देखिल उध्दव ठाकरे यावेळी म्हणाले.

आज झालेल्या बैठकीस आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी तसेच औरंगाबाद महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे उपस्थित होते. यावेळी बोलताना औरंगाबाद शहराला वैभवशाली असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. हे शहर जागतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करताना वेरूळ, अजिंठा लेण्यांप्रमाणे शहरांतर्गत पर्यटनस्थळं ही पर्यटकांच्या आकर्षणाची केंद्र झाली पाहिजेत हे विचारात घेऊन प्राणीसंग्रहालयाचे काम झाले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच औरंगाबादमध्ये आलेल्या पर्यटकांनी आवर्जून त्याला भेट दिली पाहिजे, असेही मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनामुक्त भागात शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सचा विचार!

News Desk

नवाब मलिकांचा नवा खुलासा, सांगितलं सॅम डिसूझाचं खरं नाव

News Desk

किटकांचे नियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र प्रोटोकॉल तयार करण्याचा निर्णय! – राधाकृष्ण विखे पाटील

Aprna