HW News Marathi
महाराष्ट्र

…आता राहुल गांधी, प्रियंका गांधींना भेटले प्रशांत किशोर; पंजाब निवडणुकीवर रणनितीची शक्यता

नवी दिल्ली। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दोनदा भेट घेतल्यानंतर प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, केसी वेणुगोपाल आणि पंजाबचे काँग्रेसचे प्रभारी हरीश रावतही उपस्थित होते. त्यामुळे पंजाबच्या निवडणुकीबाबत रणनीती ठरविण्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.प्रियंका गांधी यांना आज (१३जुलै) ला लखनऊला जायचं होतं. मात्र, प्रशांत किशोर यांच्यासोबत अचानक मिटिंग ठरल्याने लखनऊचा दौरा दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. पंजाबमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी प्रशांत किशोर यांना आपले प्रधान सल्लागार म्हणून नियुक्त केलं होतं. त्यानंतर आज प्रशांत किशोर राहुल गांधी आणि प्रियंका यांना भेटले. यावेळी पंजाबचे प्रभारी हरीश रावतही उपस्थित होते. त्यामुळे पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत रणनीती ठरविण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

प्रशांत किशोर हे राजकीय पक्षांसाठी निवडणूक रणनिती आखण्यात मदत करतात. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूकीमध्येही ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी साठी प्रशांत किशोरयांनी रणनिती आखली होती. तृणमूल काँग्रेस (टीएमसी) या निवडणूकीत २१३ जागांवर विजय मिळाला आहे. बंगालमध्ये भाजप टीएमसीमध्ये चांगलीच टक्कर पाहायला मिळाली होती परंतु प्रशांत किशोर यांनी भाजपला १०० पेक्षा जागा मिळणार नसल्याचे सांगितले होते तसेच १०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या तर काम सोडेन असाच इशारादिला होता.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी प्रशांत किशोर यांना प्रधान सल्लागार म्हणून नियुक्त केलं आहे. प्रशांत किशोर यासाठी केवळ १ रुपयांचे मानधन घेणार आहेत. पंजाबमध्ये कॅप्टन सरकारमध्ये प्रशांत किशोर यांना मंत्र्यांचा दर्जा देण्यात येणार आहे. यामध्ये त्यांना मंत्र्यांना ज्या शासकीय सवलती देण्यात येतात त्या सर्व सेवा पुरवल्या जाणार आहेत. शासकीय निवास, फोन, वाहतूक सुविधा, पाहुणचार, कार्यालयीन कर्मचारी, स्वीय्य सहाय्यक अशा सर्व सुविधा पंजाब सरकारकडून देण्यात येणार आहेत.

प्रशांत किशोर आणि शरद पवार भेट –

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सुद्धा तीनवेळा प्रशांत किशोर यांनी भेट घेतली आहे. महाराष्ट्रातील शरद पवार यांचे निवासस्थान सिल्व्हर ओक येथे पवार-किशोर यांची भेट झाली होती. यानंतर शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानीही पुन्हा दोनवेळा दोघांची भेट झाली होती. यामुळे देशातील राजकर्त्यांच्या नजरा या भेटीकडे वळल्या होत्या. २०२४ च्या निवडणुकीबाबत चर्चा झाली असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधकांनी मढय़ावरचे लोणी खाण्याचा प्रयत्न करू नये , राऊतांचा भाजपला टोला!

News Desk

पालघरमध्ये मॉब लिंचिंगची घटनेप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा !

News Desk

“फडणवीसजी काय राव तुम्ही तुमच्यामुळे मुख्यमंत्र्यांना पण घराबाहेर यावं लागतं”, चित्रा वाघ यांचा टोमणा

News Desk