HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही. हे वृत्त निराधार आहे, शरद पवारांचं विधान

मुंबई | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रपती होणार अश्या चर्चांना उधाण आलं होतं. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी याबाबतची मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केल्याचंही सांगितलं जात होतं. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही. हे वृत्त निराधार आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

शरद पवारांनी वृत्तांशी बोलताना ‘आमची भेट वेगळ्या कारणांसाठी झाली होती, मी राष्ट्रपती व्हावे यासाठी नाही. प्रशांत किशोर यांनी माझ्याशी माझ्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत चर्चा केल्याचं वृत्त निराधार आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी काय गणित मांडलंय हे मला माहीत नाही. प्रशांत किशोर यांनी माझी भेट घेतली. मात्र, ही राजकीय भेट नव्हती. 2024च्या निवडणुकीवर या भेटीत कोणतीही चर्चा झाली नाही’, असंही पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

नेमकं प्रकरण काय होतं?

निवडणूक रणनीतीकार अशी ओळख असणाऱ्या प्रशांत किशोर यांनी गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर काल (१३ जुलै) काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचीही भेट घेतली. या भेटीचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात असतानाच या भेटीतील मोठा तपशील बाहेर आला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आगामी राष्ट्रपती बनविण्यासाठी पीके म्हणजे प्रशांत किशोर यांची मोर्चेबांधणी सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे दिल्लीत राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे वृत्त निराधार

News Desk

विरोधी पक्षांतील नेत्यांनाही वाटते, फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत !

News Desk

देशाचे आधारस्तंभ घडविण्याचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राद्वारे होणार! मुख्यमंत्री

News Desk