HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात दिवसभरात ८ हजार ६०२ नवे कोरोनाबाधित रुग्ण, १७० रुग्णांचा मृत्यू!

मुंबई। कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६.१५ % झाले आहे.

आजची आकडेवारी-

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्य सरकारांना करोनाच्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, गरज पडल्यास पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचा देखील सल्ला दिला आहे. राज्य सरकारने मात्र निर्बंधांमध्ये कोणताही बदल केला नसल्याचं जाहीर केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातली आजची आकडेवारी काहीशी चिंतेत भर घालणारी ठरली आहे. कालच्या तुलनेत आज दिवसभरात राज्यात नोंद झालेल्या नव्या रुग्णांचा आकडा जवळपास १ हजार रुग्णांनी जास्त आहे. मंगळवारी राज्यात ७ हजार २४३ रुग्ण सापडले होते. आज हा आकडा ८ हजार ६०२ पर्यंत गेला आहे. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत करोनाची लागण झालेल्या व्यक्तींचा आकडा ६१ लाख ८१ हजार २४७ इतका झाला आहे.

मृतांचा आकडा कमी-

दरम्यान, एकीकडे नव्या करोनाबाधितांचा आकडा वाढला असताना दिवसभरात नोंद झालेल्या मृतांचा आकडा काहीसा खाली आला आहे. मंगळवारी राज्यात १९६ मृत्यूंची नोंद झाली होती. तो आकडा खाली येऊन आज दिवसभरात १७० मृत्यूंची नोंद झाली आहे. एकूण मृतांचा आकडा १ लाख २६ हजार ३९० इतका झाला आहे. तर राज्याचा मृत्यूदर अजूनही २ टक्क्यांच्या वरच आहे. बुधवारच्या आकडेवारीनुसार राज्याचा मृत्यूदर २.०४ टक्के आहे.

राज्याचा रिकव्हरी रेट-

गेल्या २४ तासांचा विचार करता राज्यात ६ हजार ०६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ५९ लाख ४४ हजार ८०१ इतका झाला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ९६.१७ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. आजघडीला राज्यात १ लाख ६ हजार ७६४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या नगरसेवकांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या

Aprna

साक्षीकडून माहीला अनोख्या शुभेच्छा

News Desk

पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल, संभाजीराजे भडकले

News Desk