HW News Marathi
महाराष्ट्र

‘काँग्रेसचा अजेंडा काय आहे हे तुम्ही त्यांनाच विचारा,’ स्वबळाच्या घोषणेवरुन प्रफुल्ल पटेल संतापले!

मुंबई। नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर मी कशाला बोलू, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं होतं. आता राष्ट्रवादीचे बडे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोलेंना टोले लगावले आहेत. आम्ही एचके पाटील काय म्हणतात त्याला महत्त्व देतो. कारण त्यांच्या बोलण्यात तथ्य असतं, अशा शब्दात प्रफुल्ल पटेल यांनी नानांना टोला लगावला आहे.

महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या विधानांमुळे व त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे काहीसं वातावरण बदललेलं पाहायला मिळतं, काँग्रेसकडून स्वबळाची भाषा केली जात आहे, तर राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेते मंडळींकडून नाना पटोलेंच्या विधानाला फारसं महत्व देत नसल्याचं दाखवलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. “काँग्रेस पक्षाने जे करायचं आहे ते करावं” असं बोलत प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

मला तर हे बोलायचं आहे की, एच के पाटील हे काँग्रेसचे राज्याचे प्रभारी आहेत त्यांनी काय सांगितलं आहे, मल्लिकार्जुन खर्गे हे त्यांचे राज्यसभेतील नेते आहेत, ते मुंबईत येऊन गेले. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आहेत आम्ही कुणाच्या बोलण्यावर जावं? अशाप्रकारच्या नेहमीच्या वक्तव्यांमुळे महाविकासआघाडीत फार फरक पडत असेल, असं मला वाटत नाही. आता तो एक मीडिया इव्हेंट नक्कीच झालेला आहे. ज्याला जे करायचं आहे त्यांनी ते करावं, आम्ही एखाद्या पक्षाला बांधून थोडीचं ठेवलं आहे, ही आघाडी आहे. याशिवाय ज्या पक्षाला जे काही करायचं आहे, त्यासाठी आम्ही का उत्तर द्यावीत.” असं पटेल म्हणाले.

माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, ”काँग्रेसचा अजेंडा काय आहे हे तुम्ही त्यांनाच विचारा, केवळ एकच मी सांगतो की महाविकासआघाडीचे जनक शरद पवार आहेत. कोणी काही म्हणो शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघआडीचं सरकार काम करत आहे. मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे आहे त्यांच्या नेतृत्वात सरकार सुरू आहे. शरद पवार हे महाविकासआघआडीचे मार्गदर्शक आहे व ते या पुढेही राहतील. म्हणून बाकीची लोकं काय बोलतात, त्यावर आम्ही दररोज उत्तर द्यायचं, खुलासा करायचा हे मला काही योग्य वाटत नाही.”

इशारा तुम्हाला माहितीच आहे

”एच.के.पाटील हे प्रभारी आहेत, ते काय म्हणतात याला मी जास्त महत्व देतो. त्यामध्ये जास्त तथ्यं असतं कारण ते थेट हायकमांडचे प्रतिनिधी म्हणून ते बोलतात. एच.के.पाटील, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे तिघेही शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले होते. याचा अर्थ काय? आता इशारा तुम्हाला माहितीच आहे.” असंही यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले.

बाकीचे काय बोलतात याला महत्त्व नाही

महाविकास आघाडीचे जनक शरद पवार आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात सरकार आहे, त्यांच्याच नेतृत्त्वात सरकार चाललंय. महाविकास आघाडीला शरद पवारांचं मार्गदर्शन आहे. पुढेही राहीलच. बाकीचे लोक काय बोलतात याला महत्त्व नाही. नाना पटोले रोज बोलतात, त्याचं प्रतिउत्तर काय द्यावं? हे आम्हाला योग्य वाटत नाही, त्याचं सविस्तर उत्तर शरद पवार यांनी दिलंय. म्हणून त्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही. त्यावर रोज खुलासा करायचा हे आम्हाला योग्य वाटत नाही. एचके पाटील यांनी विधान केलं आहे. त्यामुळे नेमकं कुणाच्या बोलण्यावर जावं? कोण काय बोलतं त्यावर दररोज चर्चा करावी हे योग्य वाटत नाही, असंही ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तो निर्णय चुकीचा होता.. पाठीत खंजीर खुपसला गेला होता!”, फडणवीसांची त्या शपथविधीवर प्रतिक्रिया

News Desk

हिंगणघाट पीडितेच्या न्यायासाठी आज वर्ध्यात पुन्हा एकदा बंदची हाक

swarit

“गोपीचंद पडळकर कुणाला भिणाऱ्याची औलाद नाही”

swarit