HW News Marathi
महाराष्ट्र

‘अखेर राज ठाकरेंनी मास्क वापरला,’ कारण…!

पुणे। महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्याला अपवाद ठरले आहे. राज ठाकरे यांनी आपण मास्क वापरणार नाही, जाहीरपणे गेल्या काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे अनेक कार्यक्रमात राज ठाकरे हे विनामास्क पाहण्यास मिळाले. पण, आज पुण्यात राज ठाकरे चक्क मास्क लावून पोहोचले होते.राज ठाकरे पुणे जिल्ह्याच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहे. आज सकाळीच त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर संध्याकाळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. या भेटीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातील एका लिखानाबाबत दोघांमध्ये विस्तृत चर्चा झाली. विशेष म्हणजे, यावेळी राज ठाकरे यांनी मास्क लावलेला होता. बाळासाहेब यांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे मास्क लावून पोहोचले होते.

राज ठाकरे यांनी मास्क लावलेला होता

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि राज ठाकरे यांच्यातला जिव्हाळा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. राज ठाकरे ज्या ज्या वेळी पुणे दौऱ्यावर असतात त्यावेळी ते हमखास पुरंदरे यांची भेट घेत असतात. 2019 मध्ये अमित ठाकरेंच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी खुद्द राज ठाकरे हे पुणे येथील निवासस्थानी आले होते. त्यानंतर बाळासाहेब पुरंदरेंनी देखील लग्नाला उपस्थिती लावत अमित आणि मितालीला आशीर्वाद दिले होते.या भेटीदरम्यान, राज ठाकरे यांनी मास्क लावलेला होता. राज यांच्यासोबत मनसेचे पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते होते. त्यामुळे कोरोनाची परिस्थितीत पाहता खबरदारी म्हणून सर्वांनी मास्क लावूनच बाळासाहेबांच्या घरी एंट्री केली.

अध्यक्षाच्या घरी जेवायला जाणं पसंत करणार

दरम्यान, पुणे दौऱ्यावर आल्यानंतर राज ठाकरे यापुढे शाखा अध्यक्षाच्या घरी जेवायला जाणं पसंत करणार आहेत,अशी घोषणाच खुद्द राज ठाकरेंनी केली आहे. आगामी वर्षातील पुणे मनपा निवडणुकीच्या तयारीसाठी राज ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत.

पहिल्याच दिवशी त्यांनी मनसे नेते, शहराध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, संघटक, शाखाध्यक्ष अशा तब्बल 40 पक्ष पदाधिकाऱ्यांशी वन टू वन संवाद साधला आणि त्यांना थेट लोकांमध्ये जाऊन काम करण्याचे आदेश दिले. तसंच पुणे शहर बैठकीत प्रभाग अध्यक्ष हे पद रद्द करून वार्डनिहाय शाखाध्यक्ष नेमण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आगामी मनपा निवडणुकीच्या तोंडावर पुणे शहर मनसेला तब्बल 181 शाखाध्यक्ष मिळतील, अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागसकर यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे भाजपचे स्वप्न पूर्ण होणार नाही! – बाळासाहेब थोरात

Aprna

‘सब घोडे बारा टके’च आहेत, अशा घोड्यांवर शर्यती जिंकता येत नाहीत!’, सेनेनं सिंग प्रकरणावरुन भाजपला सुनावले  

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली चांगलं काम सुरु आहे | अजित पवार 

News Desk