HW News Marathi
महाराष्ट्र

१ ऑगस्टपासून मुंबईत घरोघरी लसीकरण, महापालिकेचा मोठा निर्णय!

मुंबई। पुण्याऐवजी आता मुंबईतून येत्या , १ ऑगस्टपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी घरोघरी कोरोना लसीकरणाची सुरवात होणार आहे. ७५ वर्षांवरील अंथरूणावर खिळलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी बीएमसी ही विशेष लसीकरण मोहीम राबवण्यासाठी तयार असल्याचं मंगळवारी हायकोर्टात स्पष्ट करण्यात आलं. ज्येष्ठ नागरिकांसाठी दारोदारी जाऊन लसीकरण करण्याबाबत राज्य सरकारचं धोरण तयार असून हायकोर्टात सादर करण्यात आलेल्या माहितीत कोणताही मोठा बदल न करता यावरचा अंतिम मसूदा लवकरच जाहीर करु, अशी हमी राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी हायकोर्टाला दिली.

यावर समाधान व्यक्त करत आता कुठे आम्हाला यात आशेचा किरण दिसू लागलाय. या मुद्यावर केंद्र सरकारला अजुनही जाग आलेली नाही, मात्र राज्य सरकार आणि पालिका प्रशासन मुंबईच्याबाबतीत जागं झालं याचं आम्हाला समाधान आहे. या शब्दांत मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं समाधान व्यक्त केलं.

शासनाच्या भूमिकेबाबत न्यायालयाची नाराजी

दरम्यान, याआधी घरोघरी लसीकरणाबाबत राज्य सरकारचा पाचकलमी कार्यक्रम तयार असताना केंद्र सरकराच्या मंजुरीची गरज काय, असा प्रश्न उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला होता. केरळ, बिहार, झारखंडने परवानगी घेतली होती का? अशी विचारणा करून अंतिम टप्प्यात माघार घेण्याच्या राज्य शासनाच्या भूमिकेबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. तसंच नव्याने भूमिका स्पष्ट करण्याचेही आदेश दिले होते. त्यानंतर राज्य सरकारने आज मुंबई हायकोर्टात आपण केंद्राच्या परवानगीची वाट पाहणार नसल्याचं सांगितलं होतं. केंद्राच्या परवानगीशिवाय घरोघरी लसीकरण मोहीम राबवण्यास सुरुवात करणार असल्याचं राज्य सरकारने सांगितलं होतं.

येत्याकाळात इतरांसाठी उपलब्ध करण्याची आशा

हे लसीकरण प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार असून येत्याकाळात हे इतरांसाठी उपलब्ध करण्यात येईल अशी आशा आहे. जेणेकरून लसीकरणाच्या मोहिमेस अधिक बळकटी येऊन, लोकांचं लसीकरण अधिक वेगानं पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. यासंदर्भातील याचिकेवर ६ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार असून त्यासुनावणीत पालिका आणि राज्य सरकार घरोघरी लसीकरणाबाबतचा आपला अहवाल सादर करतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वाभिमानी शेतकरी संघटनेसारख्या बांडगुळांना मी घाबरत नाही

News Desk

Maharashtra Budget 2021-22 : पुणे, नगर, नाशिक २३५ किमीचा रेल्वे मार्ग उभारणार

News Desk

जिथे पॉझिटिव्हीटी रेट जास्त तिथे लसीकरण वाढवण्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपेंचें आदेश!

News Desk