HW News Marathi
महाराष्ट्र

आज दिवसभरात राज्यात ८ हजार १५९ नविन कोरोनाबधित रुग्ण!

मुंबई। राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असली, तरी देखील अद्यापही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे. रोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कधी करोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. काल कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही कोरोनाबाधितांपेक्षा जास्त होती. तर, आज पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या कोरोनातून बरे झालेल्यांपेक्षा अधिक आढळून आली आहे. आज दिवसभरात राज्यात ८ हजार १५९ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ७ हजार ८३९ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. याशिवाय राज्यात आज १६५ कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे.राज्यात आजपर्यंत एकूण ६०,०८,७५० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३३ टक्के एवढे झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाला जनादेश मिळाला आहे !

News Desk

मुंबईचे सहपोलीस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात? भाजपचा सवाल 

News Desk

“चंद्रकांत पाटलांना अफवा पसरवण्याची सवय”, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर हल्ला

News Desk