HW News Marathi
महाराष्ट्र

‘रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळुणमध्ये भीषण परिस्थिती’, 2005च्या पुनरावृत्तीची भीती!

रत्नागिरी। रात्री झालेल्या ढगफुटीमुळे चिपळुणमध्ये विदारक परिस्थिती आता निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरात पाणी शिरले असून 2005 ची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती नागरिकांना सतावू लागली आहे. शहरातील बाजारपेठ ,खेर्डी मध्ये मध्ये पाच फुटापेक्षा जास्त पाणी शिरले असून अख्खी बाजारपेठ पाण्याखाली आहे. याशिवाय शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून मुंबई-गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे . तर शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने आता शेकडो लोक पाण्यात अडकले आहेत.

या दोन नद्या अर्थातच वाशिष्ठी, शिवनदीच्या पुराच्या पाण्याची पातळी वाढली असून चिपळूण शहरातील जुना बाजार पुल आणि नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गेले असून दिसेनासे झाले आहेत. रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने याशिवाय कुंभार्ली घाट माथ्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाणी शहरात आले आहे .वाशिष्टी शिवनदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी आणखी वाढत आहे .शहरातील जुना बाजार पूल ,बाजारपेठ, जुने बस स्टॅन्ड ,चिंचनाका मार्कंडी, बेंदर्कर आळी, मुरादपुर रोड, एसटी स्टँड ,भोगाळे ,परशुराम नगर परिसरात पाणी वाढत आहे. रॉयल नगर तसेच राधाकृष्ण नगर मधील घरांमध्ये पाणी शिरले असून अनेकांच्या चारचाकी व दुचाकी पाण्याखाली आहेत. याशिवाय अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेक जण घरात अडकले आहेत.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पहाटे चार वाजल्यापासून शहरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरू लागले आणि अवघ्या दोन तासात कंबरभर पाणी झाले. शहरालगतच्या खेर्डी मध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून अनेक घरे पाण्याखाली आहेत या घरातील काही लोक या पुरात अडकले असून त्यांना मदतीची प्रतीक्षा आहे .बाजारपेठेत कंबरभर पाणी असून चिपळून खेडी मध्ये 2005 ची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती असून आता या पुराने 2005 चीपातळी गाठली आहे याशिवाय पावसाचा जोर वाढत असून पाणी पातळीत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आता निर्माण झालं आहे.

त्र्यंबकेश्वर नगरी पाण्यात

नाशिक जिल्ह्यात अवघ्या काही तासांच्या पावसात त्रंबकेश्वर नगरी पाण्यात गेली आहे. रात्री झालेल्या पावसाने नाल्याचं पाणी रस्त्यावर आलं आहे. अनेकांच्या घरात पाणी घुसलं असल्यानं नगरपालिकेचे नाले सफाईचे दावे फोल ठरले आहेत. सध्या नाशिकमध्ये पावसाने सध्या तरी उसंत घेतली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या भेटीला ‘सिल्व्हर ओक’वर! नेमकं कारण काय?

News Desk

“मोदी मंदिरात दर्शनाला जो येईल त्याला लगेच…”प्रशांत जगतापांची मोदींवर खोचक शब्दात टीका!

News Desk

छत्रपती घराण्यांचा अपमान केल्याबद्दल वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करा

News Desk