HW News Marathi
महाराष्ट्र

‘सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस,’ कोयनेच्या विसर्गामुळे कृष्णा नदी पात्राबाहेर, मुश्रीफांची माहिती!

सांगली। चिपळूण रत्नागिरीत धगफुटी नंतर आता कोल्हापूर जिल्ह्यात देखिल मुसळधार पाऊस सुरुच आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून आता नदीची वाटचाल धोका पातळीकडे सुरु आहे. त्यामुळे नदीच्या परिसरात असलेल्या गावांमधील लोकांना सुरक्षित स्थळी नेलं जात आहे. एनडीआरएफच्या दोन टीम दाखल झाल्या असून त्यांच्याकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचं काम केलं जात आहे. याबाबत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज तरी परिस्थिती आटोक्यात असल्याचं म्हटलंय. मात्र दोन दिवस असाच पाऊस राहिला तर परिस्थिती गंभीर होऊ शकते, असे देखील हसन मुश्रीफ म्हणाले.

चिपळुणसारखी स्थिती कोल्हापूर जिल्ह्यात सध्यातरी नाही

संभाव्य पूराचा धोका पाहता जिल्हा प्रशासनाकडून योग्य नियोजन केलं गेलं आहे. चिपळुणसारखी स्थिती कोल्हापूर जिल्ह्यात सध्यातरी नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन मुश्रीफ यांनी केलंय. काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची येडियुरप्पा यांच्याशी बोलणं झालं आहे. आलमट्टी धरणातून पाणी सोडलं जातं की नाही हे पाहण्यासाठी आलमट्टी धरणावर महाराष्ट्र सरकारचा अधिकारी ठेवला आहे. परिस्थिती बिघडली तर एनडीआरएफच्या अजून टीम बोलावल्या जातील. नागरिकांना स्थलांतरित करायची वेळ आली तर होम क्वारंटाईन असलेल्या नागरिकांची वेगळी व्यवस्था केली जाईल, असंही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितलं.

नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्या

जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असल्याने डोंगराळ भागात भूस्खलन, दरडी कोसळणे, स्थानिक नाल्यांना तात्काळ पूर येणे अथवा गावठाणातील जुन्या घरांची पडझड अशा घटना संभवत असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी केलंय.कोल्हापुरातील पंचगंगा नदी इशारा पातळीजवळ पोहोचलेली आहे, धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. तिकडे कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने सांगली-कोल्हापूरला थोडा दिलासा मिळालेला आहे.

कृष्णा नदी पात्राबाहेर

सांगली जिल्ह्यात गेले आठवडाभर पावसाची उघडझाप सुरू होती. कालपासून सलग पाऊस सुरू आहे. या संततधार पावसामुळे ओढे नाले भरून वाहत आहेत. त्यामुळे या पावसाळ्यात कृष्णा नदी दुसर्यांदा पात्राबाहेर पडून वाहत आहे. पलूस तालुक्यातील आमणापूर येथील कृष्णा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडून वाहत आहे. तर, कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने आज कोयना धरणातून पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे सांगली पाटबंधारे विभागाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कोयना धरणात येणारी पाण्याची आवक पाहता येत्या 24 तासात हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पवारांनीच मागील ५० वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा घात केला!”

News Desk

सत्तेबाहेर असतानाही बाळासाहेब ठाकरेंनी राज्यातील राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला!

News Desk

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकासआघाडीतून बाहेर, राजू शेट्टींची मोठी घोषणा

Aprna