अलिबाग। रायगड जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनाचे सात बळी गेले आहेत. महाड, पोलादपूरमध्ये हाहाकार उडाला आहे. पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, नेव्हीचे बचावकार्य आता सुरु झाले आहे. महाड पुराने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. महाडमध्ये मोबाईल आणि अन्य संपर्क यंत्रणा अजूनही ठप्प आहे. याठिकाणी बचावकार्याला सुरुवात झाली असून, नौदलाची टीम महाडमध्ये दाखल झाली आहे. तर नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहचवण्यात येत आहे.
दरडीत 32 घरं बाधीत झाली
महाड शहर आणि जवळच्या गावांमध्ये पूरस्थिती आहे. पुराचं पाणी आणि अनेक ठिकाणी कोसळलेल्या दरडीमुळे लोक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. महाडमध्ये विविध भागात लोक अडकले आहेत. महाडच्या तळीये गावात कोसळलेल्या दरडीत 32 घरं बाधीत झाली आहेत. 72 लोक या दरडीत अडकले आहेत.
पाणीपातळी कमी होण्यास सुरूवात
अतिवृष्टीमुळे महाड शहर आणि जवळच्या गावांमध्ये पूरस्थिती आहे.पुराचे पाणी आणि अनेक ठिकाणी कोसळलेल्या दरडीमुळे लोक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. रायगडमध्ये बचाव कार्यासाठी काल हेलीकॉप्टरची मागणी केली होती. आज बचाव कार्यासाठी नेव्हीचे हेलीकॉप्टर दाखल झाले आहे. दरम्यान, महाड शहर आणि परिसरातील पाणीपातळी कमी होण्यास सुरूवात झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. महाडमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे.
अमरावतीत पावसाचा ऑरेंज अलर्ट
चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचा हाहाकार दिसून आला आहे. हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. येथील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात झाला आहे. त्यामुळे दुसरा दिवसही अंधारात काढवा लागला आहे. पुराचे पाणी अजूनही पाणी कमी झालेले नाही. दरम्यान, चे बचावकार्य सुरू झाले आहे. संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आले आहे. विदर्भातल्या अमरावतीत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पूरस्थितीची मुंबईकरांना झळ
उद्या मुंबईकडे होणारा गोकूळचा दूध पुरवठा बंद राहणार आहे. मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा गोकुळ दूध संकलनावर मोठा परिणाम झाला आहे. गोकुळच 76 हजार लिटर दूध संकलन घटलं. आज तब्बल दहा ते अकरा लाख लिटर संकलन घटण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पूर परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील बहुतांशी रस्ते बंद असल्यामुळे गोकुळच्या दूध संकलनावर मोठा परिणाम झाला आहे. गोकूळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांची माहिती दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.