HW News Marathi
महाराष्ट्र

‘दरड सत्र सुरूच….’ साताऱ्यात आंबेघर गावात 12 जणांचा मृत्यू…!

सातारा। महाडच्या तळई गावात दरड कोसळून दुर्घटना झाल्या नंतर 38 जणांचा मृत्यू झालेला असतानाच आता इकडे दुसरीकडे साताऱ्यातील आंबेघर गावात दरड कोसळली आहे. आणि या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केलं आहे.

मदकार्य सुरू-

स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत कार्य सुरू केले आहे. मुसळधार पावसामुळे मदत कार्यामध्ये अडचणी येत आहेत या भागातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान पाटण तालुक्यातील ढोकावळे येथेही घरांची पडझड होऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे तर किल्ले मोरगिरी येथेही दरड कोसळल्याने महादेवाचे मंदिर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहे. येथील परिसरातील ग्रामस्थांना प्रशासनाने इतरत्र हलवले आहे ही घटना ही गुरुवारी सायंकाळी घडली आहे.

एनडीआरएफची टीम साताऱ्यात दाखल

मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील वाई आणि पाटण तालुक्यात दरड कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. घरांवर दरड कोसळल्याने ढिगाऱ्याखाली काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम साताऱ्यात दाखल झाली आहे.

पाटण तालुक्यातील मोरणा-गुरेघर भागातील आंबेघर गावामध्ये दरड कोसळली आहे. दरड दोन तीन घरांवर कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून ढिगाऱ्याखाली 7 ते 8 लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळाकडे रवाना झाली आहे.

बचावकार्यात अडथळे येत होते

तर वाई तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या कोंढावले जवळ देवरुखवाडी येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. यामुळे चार ते पाच घरे ढिगाऱ्याखाली गेली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. प्रशासन घटनास्थळी पोहचले असून काही लोकांचा संपर्क होत नसल्याने बचावकार्यात अडथळे येत होते. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 27 नागरिकांची सुटका रात्री करण्यात आलेली असून, अजून 2 महिला मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आहेत. ढिगाऱ्याखालून सुटका केलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘त्या’ तीन गोष्टी केल्याशिवाय ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा नाही, शरद पवारांचं भाष्य!

News Desk

केवळ लक्ष्मीपुजनाच्या दिवशी फटाके वाजवण्यास पालिकेची परवानगी

News Desk

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र येणार

News Desk