HW News Marathi
महाराष्ट्र

‘भारतीय स्वातंत्र्य व महान लोकशाहीचा गळा दाबण्याचाच प्रकार’, सेनेची केंद्र सरकारवर टीका!

मुंबई। दैनिक ‘भास्कर’ वृत्तपत्र समूह आणि ‘भारत समाचार’ या वृत्तवाहिनीवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आले दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू असताना हे छापे पडावेत याचे आश्चर्य वाटते. कोरोना मृत्यूच्या आकडयात गडबड असल्याचे वारंवार सांगणाऱ्या ‘भास्कर’ चा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असेल तर ते भारतीय स्वातंत्र्य व महान लोकशाहीचा गळा दाबण्याचाच प्रकार आहे, असं म्हणत आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागले आहे. तसंच आणीबाणीपेक्षा आता वेगळे काय घडत आहे? अशी संतप्त प्रतिक्रिया देत, केंद्र सरकारवर घणाघात केला.

लोकशाहीचा गळा दाबण्याचाच प्रकार

कोरोना मृत्यूच्या आकडयात गडबड असल्याचे वारंवार सांगणाऱ्या ‘भास्कर’ चा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असेल तर ते भारतीय स्वातंत्र्य व महान लोकशाहीचा गळा दाबण्याचाच प्रकार आहे. गेल्या पाच वर्षांत देशातल्या 7 प्रमुख क्षेत्रांत 3.64 कोटी लोक बेरोजगार झाल्याचा लेखाजोखा ठळकपणे मांडणाऱ्या ‘भास्कर’ ला सरकारी दमनचक्राखाली दडपून मारता येईल असे कुणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहेत.

सुपात जे सुरक्षित आहेत त्यांनी जात्यात पडण्याची

दैनिक ‘भास्कर’ वृत्तपत्र समूह आणि ‘भारत समाचार’ या वृत्तवाहिनीवर आयकर विभागाचे र छापे पडले आहेत. आणि दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू असताना हे छापे पडले याच आश्चर्य आहे. तर वृत्तपत्र स्वातंत्र्याचा अधिकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहे. अशा दडपशाहीविरुद्ध प्रत्येकानेच उभे राहिले पाहिजे. त्याच्याशी ‘सामना’ केला पाहिजे . ‘भास्कर’ ने लढण्याचा निर्धार केला आहे तसा ‘भारत समाचार’ ने केला आहे. आज दै . ‘भास्कर’, ‘भारत समाचार’ जात्यात आहे. सुपात जे सुरक्षित आहेत त्यांनी जात्यात पडण्याची वाट पाहू नये, असेदेखील संजय राऊत म्हणाले.

झुकण्याची व याचक म्हणून दारात उभे राहण्याची त्यांची परंपरा नाही

या वृत्तसमूहाचा व्याप खूप मोठा आहे. देशभरात त्यांच्या आवृत्त्या निघतात व त्या लाखोंनी संपतात. हिंदी भाषिक पट्ट्यांत ‘भास्कर’चे जनमानसावर वजन आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक विकले जाणारे वर्तमानपत्र असा दै. ‘भास्कर’चा लौकिक आहे. दै. ‘भास्कर’मधील वार्तांकन हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ, पारदर्शक व तप्त असते. ते संयमी तितकेच सत्यवादी असते. सरकारपुढे झुकण्याची व याचक म्हणून दारात उभे राहण्याची त्यांची परंपरा नाही. थोडक्यात, इतर ‘माध्यमां’प्रमाणे ते सरकारचे मिंधे झाले नाही.

सत्य लिहिणाऱ्या वृत्तपत्रांची ‘नखे’

राजकीय विरोधकांना ईडी, सीबीआयच्या माध्यमांतून छळले जात आहेच, आता सत्य लिहिणाऱ्या वृत्तपत्रांची ‘नखे’ उपटली जात आहेत. गंगेतून कोरोनाग्रस्तांची प्रेते वाहत आली तेव्हा त्यांचे पानभर छायाचित्र छापून त्यावर ‘भास्कर’ने शीर्षक दिले- ‘शर्मसार हुई गंगा!’ ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांचा श्वास कसा गुदमरत आहे ते याच ‘भास्कर’ने समोर आणले. मध्य प्रदेशात एप्रिल महिन्यात ऑक्सिजनअभावी 15 दुर्घटनांत 60 मृत्यू झाल्याचे ‘भास्कर’ने छापले. केंद्र सरकारचा दावा त्याने फोल ठरला. गुजरातमध्ये एका महिन्यात कोरोनामुळे 3,578 मृत्यू झाल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले.

3.64 कोटी लोक बेरोजगार

‘भास्कर’ने एक्सपोज केले की, अहमदाबादमध्येच या काळात 3,416 मृत्यू झाले. कोरोना मृत्यूच्या आकडय़ात गडबड असल्याचे वारंवार सांगणाऱ्या ‘भास्कर’चा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असेल तर ते हिंदुस्थानी स्वातंत्र्य व महान लोकशाहीचा गळा दाबण्याचाच प्रकार आहे. गेल्या पाच वर्षांत देशातल्या 7 प्रमुख क्षेत्रांत 3.64 कोटी लोक बेरोजगार झाल्याचा लेखाजोखा ठळकपणे मांडणाऱ्या ‘भास्कर’ला सरकारी दमनचक्राखाली दडपून मारता येईल असे कुणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहेत.

शेतकऱ्यांना न्याय नाकारला जातोय

आज या देशात शेतकऱ्यांना न्याय नाकारला जातोय, पत्रकारांवर पाळत ठेवली जातेय आणि वृत्तपत्रांना बंधक बनवले जात असेल तर लोकशाहीवर कुणीतरी मारेकरी घातले आहेत काय? अशी शंका पक्की होते. वृत्तपत्र स्वातंत्र्याचा अधिकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहे. अशा दडपशाहीविरुद्ध प्रत्येकानेच उभे राहिले पाहिजे. त्याच्याशी ‘सामना’ केला पाहिजे. ‘भास्कर’ने लढण्याचा निर्धार केला आहे तसा ‘भारत समाचार’ने केला आहे.अस देखील राऊत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसेवा हेच खरे अध्यात्म असल्याची शिकवण गुरुमाऊलींच्या विचारातून मिळते! -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

औरंगाबादमध्ये पहिल्या फेरीत महाविकासआघाडीच्या सतीश चव्हाण यांची आघाडी

News Desk

इगोपोटी राज्य सरकारने मेट्रो कारशेडचा निर्णय घेतला -फडणवीस

News Desk