मुंबई भांडूप परिसरात 15 वर्षीय मुलीवर चार जणांनी 24 तास बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. यातील एक आरोपी मुलीच्या वडीलाचे मित्र आहे. तीन आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. एक आरोपी फरार आहे. मुलीला ट्रॅम्बे येथून अपहर करण्यात आले होते. याप्रकरणी ट्रॅाम्बे पोलिसांनी पॅॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केली आहे.
मानखुर्द परिसरात १५ वर्षाची मुलगी कुटुंबीयांसोबत राहते. बुधवारी दुपारी वडिलांचा मित्र असलेल्या ३२ वर्षाच्या व्यक्तीने तिला सोबत फिरायला जाऊ म्हणून सांगितले. मुलीनेही कुणालाही काही न सांगता दुपारी दोन वाजता घर सोडले. तो तिला घेऊन भांडुपमधील अन्य आरोपीच्या घरी घेऊन आला. तेथे त्याचे १९ ते २० वयोगटातील अन्य तीन मित्र अधी पासूनच होते. त्यांनी दरवाजा बंद करुन तिच्यावर आळीपाळीने 24 तास बलात्कार केले.
त्यानंतर तिला गुरूवारी दुपारी धमकाहून घरी पाठविले.मुलीचे घरचे मुलगी घरी आली नाही म्हणून हरवल्याचे ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केले होते. त्यानुसार ट्रॉम्बे पोलिसांनी तिचा शोध सुरु केला. गुरुवारी मुलीने घरी येऊन तिच्यावर झालेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनी तत्काळ ट्रॉम्बे पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन ट्रॉम्बे पोलिसांनी पॉक्सो, लैंगिक अत्याचार ,अपहरणाचा गुन्हा दाखल करुन शोध सुरु केला. याप्रकरणातील तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता. त्यांना १२ जुलै पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
previous post