पुणे | राज्यात कोरोनाबधितांचा आकडा १३६४ इतका झाला आहे. यात मुंबई आणि पुण्यात कोरोनाग्रस्तांचे प्रमाण अधिक आहे. आज (१० एप्रिल) पुण्यात नव्याने १५ कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील ११ जणांवर नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, ४ जण ससून रुग्णालात उपचारासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान, पुण्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या १९० वर पोहोचली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत पुण्यातील कोरोनासंदर्भातील माहिती दिली आहे.
पुणे शहरात १५ नवे कोरोनाबाधित !
पुणे शहरात आणखी १५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील ११ जण @PMCCare च्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात तर ४ जण ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत. पुणे शहरातील रुग्णांची संख्या १९० झाली असून जिल्ह्यातील संख्या २२५ झाली आहे.#PuneFightsCoroona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 10, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.