HW News Marathi
Covid-19

आतापर्यंत १५ हजार ७८६ रुग्णांना डिस्चार्ज, राज्यात कोरोनाचे एकूण ५२ हजार ६६७ रुग्ण

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ६६७ झाली आहे. आज ( २५ मे) २ हजार ४३६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ११८६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १५ हजार ७८६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३५ हजार १७८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आज एका दिवसात राज्यभरातून ११८६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामध्ये सर्वाधिक ९०० रुग्ण मुंबई मंडळात सोडण्यात आले आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये ५०१, ठाणे ३३७, पालघर १६, रायगड ४६, नाशिक ४, जळगाव, ३, पुणे १०९, सोलापूर २, कोल्हापूर ३, सांगली ३, रत्नागिरी ९, औरंगाबाद ९४, जालना २, हिंगोली १, लातूर १०, उस्मानाबाद २, अकोला १७, अमरावती ४ आणि नागपूर २३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

राज्यात आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ७८ हजार ५५५ नमुन्यांपैकी ५२ हजार ६६७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ३० हजार २४७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार ४७९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात ६० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १६९५ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५४ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित ६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ३८, पुण्यात ११, नवी मुंबईत ३, ठाणे शहरात २, औरंगाबाद शहरात २, सोलापूरात १, कल्याण डोंबिवलीमध्ये १, रत्नागिरीमध्ये १ मृत्यू झाले आहेत. याशिवाय बिहार मधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४२ पुरुष तर १८ महिला आहेत. आज झालेल्या ६० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २७ रुग्ण आहेत तर २९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या ६० रुग्णांपैकी ४७ जणांमध्ये (७८ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी

  • मुंबई : ३१,९७२ (१०२६)
  • ठाणे: ४५७ (४)
  • ठाणे मनपा: २७३९ (३८)
  • नवी मुंबई मनपा: २०६८ (३२)
  • कल्याण डोंबिवली मनपा: ९४१ (८)
  • उल्हासनगर मनपा: १८० (३)
  • भिवंडी निजामपूर मनपा: ९८ (३)
  • मीरा भाईंदर मनपा: ४७५ (५)
  • पालघर:१२० (३)
  • वसई विरार मनपा: ५९७ (१५)
  • रायगड: ४३१ (५)
  • पनवेल मनपा: ३६० (१२)
  • ठाणे मंडळ एकूण: ४०,४३८ (११५४)
  • नाशिक: १२३
  • नाशिक मनपा: १२९ (२)
  • मालेगाव मनपा: ७२१ (४४)
  • अहमदनगर: ५७ (५)
  • अहमदनगर मनपा: २०
  • धुळे: २३ (३)
  • धुळे मनपा: ९५ (६)
  • जळगाव: ३०१ (३६)
  • जळगाव मनपा: ११७ (५)
  • नंदूरबार: ३२ (२)
  • नाशिक मंडळ एकूण: १६१८ (१०३)
  • पुणे: ३६० (७)
  • पुणे मनपा: ५३१९ (२६०)
  • पिंपरी चिंचवड मनपा: ३१७ (७)
  • सोलापूर: २४ (२)
  • सोलापूर मनपा:५९९ (४०)
  • सातारा: ३१४ (५)
  • पुणे मंडळ एकूण: ६९३३ (३२१)
  • कोल्हापूर:२४४ (१)
  • कोल्हापूर मनपा: २३
  • सांगली: ७२
  • सांगली मिरज कुपवाड मनपा: ११ (१)
  • सिंधुदुर्ग: १०
  • रत्नागिरी: १६७ (४)
  • कोल्हापूर मंडळ एकूण: ५२७ (६)
  • औरंगाबाद:२६
  • औरंगाबाद मनपा: १२६३ (४८)
  • जालना: ६३
  • हिंगोली: १३२
  • परभणी: १८ (१)
  • परभणी मनपा: ६
  • औरंगाबाद मंडळ एकूण: १५०८ (४९)
  • लातूर: ७४ (३)
  • लातूर मनपा: ८
  • उस्मानाबाद: ३७
  • बीड: ३२
  • नांदेड: १५
  • नांदेड मनपा: ८३ (५)
  • लातूर मंडळ एकूण: २४९ (८)
  • अकोला: ३६ (२)
  • अकोला मनपा: ३८४ (१५)
  • अमरावती: १५ (२)
  • अमरावती मनपा: १६७ (१२)
  • यवतमाळ: ११५
  • बुलढाणा:४१ (३)
  • वाशिम: ८
  • अकोला मंडळ एकूण:७६६ (३४)
  • नागपूर: ७
  • नागपूर मनपा: ४६८ (७)
  • वर्धा: ६ (१)
  • भंडारा: १४
  • गोंदिया: ४३
  • चंद्रपूर: १५
  • चंद्रपूर मनपा: ९
  • गडचिरोली: १५
  • नागपूर मंडळ एकूण: ५७७ (८)
  • इतर राज्ये: ५१ (१२)

एकूण: ५२ हजार ६६७ (१६९५)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरे यांनी सरकारला आर्थिक घडी सावरण्यासाठी दिला ‘हा’ सल्ला

News Desk

मुंबईतील MMRDA मैदानात क्वॉरंटाईन सुविधेची पाहणी करताना शरद पवार

News Desk

उदयनराजेंच्या शपथीदरम्यान झालेला ‘तो’ प्रकार व्यंकय्या नायडूंसह भाजपला भोवणार ?

News Desk