HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

#Vidhansabha2019 : राज्यात १५०४ उमेदवारांनी घेतले अर्ज मागे

मुंबई । विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची कल (७ ऑक्टोबर) शेवटची तारी होती. यावेळी नांदेड जिल्ह्यातील भोकरमध्ये एका दिवसात तब्बल ८४ उमेदवारांनी त्याचे अर्ज मागे घेण्याचा अनोखा विक्रम केला आहे. यामुळे भोकर काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना त्यांच्या मतदारसंघात तब्बल १३४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा संख्येत भोकर राज्यात अव्वल ठरले होते.मात्र, आता १३४ पैकी ९१ अर्ज वैध ठरले होते.

तब्बल ९१ उमेदवार असल्याने प्रशासन आणि अशोक चव्हाण यांना डोकेदुखी ठरणार होती. मात्र शेवटच्या दिवशी तब्बल ८४ उमेदवारांनी अर्ज माघार घेतले आहे. आता भोकरमध्ये केवळ ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्यभरात २८८ मतदारसंघातून एकूण १५०४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे ४७३९ वैध उमेदवारांपैकी आता ३२३९ उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

 या मतदारसंघात सर्वाधिक आणि सर्वात कमी उमेदवार 

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मतदारसंघात फक्त ३ उमेदवार तर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ३७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. नांदेड दक्षिण, बीड, औरंगाबाद पूर्व, जालना या चार मतदारसंघात ३१ पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्याने एका ईव्हीएमसाठी ३ बॅलेट युनिटची आवश्यकता राहणार असून कंट्रोल युनिट एकच लागणार आहे.

आचारसंहितेनंतर ४८.२ कोटींचा मुद्देमाल जप्त

आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात ११ कोटी ३९ लाख रुपयांची रोकड, १२ कोटी ४७ लाख रुपयांची दारु, १५ कोटी २९ लाख रुपये किमतीचे मादक पदार्थ आणि ८ कोटी ८७ लाख रुपये किमतीचे सोने, चांदी व अन्य मौलवान दागिणे असा सुमारे ४८ कोटी २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले

Related posts

नंदुरबार-धुळे मार्गावर भीषण अपघात

अपर्णा गोतपागर

मुंबई महानगरपालिकेचा ३३ हजार ४४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर

News Desk

Bhima Koregaon Case : वरवर राव यांना २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

News Desk