HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे उपोषण मागे

पुणे । छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्वायत्तता अबाधित ठेवावी, यांसह विविध मागण्यांसाठी आज खासदार संभाजीराजे यांनी उपोषण सुरू केले होते. मात्र त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करून सारथीची स्वायत्तता कायम राहणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर सुरु असलेले एक दिवसीय लाक्षणिक उपोषण मागे घेतले.

याबाबत अधिक माहिती अशी की, याबाबत अधिक माहिती अशी की, ‘सारथी संस्थेवर लादण्यात आलेल्या निर्बंधामुळे मराठा समाजाच्या युवकांनी आणि मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संभाजीराजेंसह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि सारथीचे विद्यार्थी आगरकर रस्त्यावर उपोषणाला बसले होते.

सरकारच्या वतीनं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, पुण्यात उपोषणस्थळी जाऊन आंदोलकांशी चर्चा केली. सारथी या संस्थेची स्वायत्तता अबाधित राहील, प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांना तात्काळ पदावरून हटवण्यात येईल. सारथी संस्थेबाबत त्यांनी काढलेले सर्व जीआर मागे घेण्यात येत आहेत, असं शिंदे यांनी जाहीर केलं.

काय होतं हे छत्रपती संभाजीराजेंच उपोषण?

सारथी संस्थेच्या गैर कारभाराविरोधात खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे पुण्यात सारथी संस्थेच्या बाहेर लाक्षणिक उपोषण सुरु होते. ‘सारथी बचाव’ अशी हाक देत मराठा समाजातील तरुणांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला होता. महिनाभरात 22 पत्रके काढूनही मुख्य सचिव जे.पी. गुप्ता यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. उलट ‘सारथी’ला बदनाम करण्याचे काम केले, असा आरोप संभाजीराजे यांनी केला. “गेले अनेक दिवस मी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे. विशेष म्हणजे या संस्थेचे उद्घाटन माझ्या अध्यक्षतेखालीच झाले होते. या संदर्भात काही दिवसांपूर्वी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटलो होतो. त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तात्काळ मार्ग काढण्याचा शब्दही दिला होता”, असे संभाजी राजे यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विधिमंडळाच्या नेत्यांची होणार बैठक

News Desk

‘महाराष्ट्राचे मंत्री ११ दिवस गायब’ जनता वाऱ्यावर आहेचं पण मंत्र्यांना तरी शोधा!

News Desk

आघाडीचे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला हा संसार आहे – राम शिंदे

News Desk