मुंबई | राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविडसंदर्भातील ८१ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या १५९ घटना घडल्या. त्यात ५३५ व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनीआज दिली. कोरोनाचा सामना करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. या अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आल्याची राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिली आहे. राज्यात लॉकडाऊनच्या कालावधीत कलम १८८ नुसार ८१,०६३ गुन्हे नोंद झाले असून १६,५४८ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तर विविध गुन्ह्यांसाठी २कोटी ८५ लाख ५०हजार ३९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पोलीस विभागाचा ‘१०० नंबर’ हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या ‘१०० नंबर’ देखील मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्याचे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत ‘१०० नंबर’ वर ७९,९०१ फोन आले असून त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ६१८ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण १,५५,०७६ व्यक्ती क्वारंटाईन आहेत. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या ११०७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ४९,११३ वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.
पोलिसांसाठी दवाखाने राखीव
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील ३ पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. १४पोलीस अधिकारी व ८५ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. तसेच मुंबईत दोन हॉस्पिटल पोलिसांवर उपचार करण्यासाठी राखीव ठेवण्यात आले. राज्यात एकूण ४७८५ हजार रिलिफ कँम्प आहेत. जवळपास ४,९७,२५६ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.