HW News Marathi
महाराष्ट्र

कल्याण पूर्वेकडील स्कायवॉकचे काम पूर्ण

कल्याण – कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे बांधण्यात येणारा कल्याण पूर्वेकडील रेल्वेस्थानकाला जोडणारा स्कायवॉकचे काम पूर्ण झाले असून स्काय वॉक वरील तिकीट खिडकीचे काम पूर्ण झाल्यानंतर येत्या १० दिवसांत हा स्काय वॉक खुला होणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह सोमवारी या कामाची पाहणी करून पुलाच्या खाली असलेल्या तिकीट खिडकीचे तातडीने पुलावर स्थलांतर करण्याचे निर्देश दिले. तसेच, कल्याण पूर्वेला स्काय वॉक जवळ उपलब्ध असलेल्या मोठ्या जागेत पेव्हर ब्लॉक टाकून रिक्षा स्टॅन्ड, वाहन तळ आणि स्वच्छतागृह बांधण्यासाठी एका आठवड्यात आराखडा सादर करण्याचे निर्देशही त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले.

महापौर राजेंद्र देवळेकर, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, गटनेते रमेश जाधव आदी याप्रसंगी उपस्थित होते.

या स्काय वॉकचे काम २०१० पासून सुरू असून खा. डॉ. शिंदे यांनी २०१४ मध्ये खासदार झाल्यापासून या कामाला गती देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. परिणामी गेल्या दोन वर्षांत हे काम वेगाने पूर्ण झाले. केवळ तिकीट खिडकीच्या स्थलांतराचे काम बाकी असून येत्या १० दिवसांत हा स्काय वॉक खुला होणार आहे.

गणेश मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या रॅम्पच्या कामालाही महापालिकेने सुरुवात केली असून वर्षभरात ते पूर्ण होण्याची शक्यता आहे.

कल्याण पश्चिमेकडच्या स्टेशन परीसरालाही खा. डॉ. शिंदे आणि महापौर देवळेकर यांनी भेट देऊन तेथील रेल्वेच्या हद्दीतील अडथळे दूर करून रिक्षा स्टॅन्ड चा परिसर मोकळा करण्याचे निर्देश दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तलवार कशी गाजवायची हे मला माहिती आहे, योग्य वेळी तलवार फिरवेन! – उद्धव ठाकरे

Aprna

विविध क्षेत्रातील अग्रेसर महिलांचा अभिमान! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

शिवसेनेकडे कट्टर निस्वार्थी अकाउंट्स आहेत, सेनेचा भाजपला जोरदार टोला 

News Desk