मुंबई | राज्यातील कोरोनाबाधितांच्या दररोज वाढणाऱ्या आकड्यात पुन्हा एकदा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून आज (२९ ऑगस्ट) देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत १६ हजार ८६७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे, आतापर्यंत राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ७ लाख ६४ हजार २८१ वर पोहोचला आहे. तर, गेल्या २४ तासांत३२८ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
राज्यासाठी दिलासादायक बाब अशी कि, याच एका दिवसांत ११ हजार ५४१ रुग्ण हे कोरोनमुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ५ लाख ५४ हजार ७११ वर पोहोचली आहे. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण १ लाख ८५ हजार १३१ इतके ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता ७२.५८ % झाले आहे.
16,867 new #COVID19 cases, 11,541 discharges and 328 deaths reported in Maharashtra today. The total number of positive cases now stands at 7,64,281 including 1,85,131 active cases, 5,54,711 recoveries and 24,103 deaths: State Health department pic.twitter.com/M3rF0IULAI
— ANI (@ANI) August 29, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.