HW News Marathi
महाराष्ट्र

संतापजनक! रोडरोमियोच्या त्रासाला कंटाळून अंबाजोगाईत १७ वर्षीय मुलीची आत्महत्या

बीड | बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव गावात अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेने संबंध संपूर्ण जिल्हा अक्षरशः हादरून गेला आहे. बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे घडली. गावातील एका रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने दिल्यानंतर संबंधित रोडरोमिओवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दिपाली रमेश लव्हारे (वय १७, रा. पट्टीवडगाव) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तिने नुकतीच बारावीची परिक्षा दिली होती. दिपालीचे वडील राज्य परिवहन मंडळात चालक असून सध्या पालघर येथे कार्यरत आहेत. दिपालीची आई सुमित्रा यांच्या फिर्यादीनुसार, मागील काही दिवसांपासून त्यांच्या घराशेजारी राहणारा अकबर बबन शेख हा तरुण दिपालीला कॉम्प्युटर क्लासला जात येत असताना छेडत होता. रस्त्यात अडवून वेडेवाकडे बोलणे, सतत त्रास देणे अशा पद्धतीने तो तिला त्रास देत होता.

याबाबत दिपालीने आईला सांगितले. शुक्रवारी (०६ मे) दिपालीच्या वडिलांनी अकबरला बोलावून घेऊन तिला त्रास न देण्याबद्दल बजावले होते. परंतु, त्याच्या वागण्यात फरक पडला नाही. त्याचे त्रास देणे सुरु असल्याचे दिपालीने आईला सांगितले होते. त्यावर वडील आणि भाऊ आला की आपण मार्ग काढू अशी आईने तिची समजूत देखील घातली. मात्र, अखेर सततच्या त्रासाला कंटाळलेल्या दिपालीने मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आई गावातील जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला गेली असताना घरात साडीने गळफास घेतला.

रात्री ११ वाजताच्या सुमारास आई घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. नातेवाईकांच्या मदतीने दिपालीला स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तिथे डॉक्टरांनी तपासून तिला मयत घोषित केले असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सदर फिर्यादीवरून अकबर बबन शेख याच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात कलम ३०५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असल्याची माहिती संबंधित पोलिसांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज राज्यात ग्रामपंचायत मतदानाची रणधुमाळी!

News Desk

एकनाथ खडसेंच्या ‘त्या’ सीडीची मी वाट बघतोय!

News Desk

महाराष्ट्र पोलीस अकादमी येथील विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार उद्घाटन!

News Desk