HW News Marathi
महाराष्ट्र

धारावीत एकाच कुटुंबातील २ जण कोरोना पॉझिटिव्ह, धारावीचा आकडा ७ वर

मुंबई | धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. एकाच कुटुंबातील २ जणांंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. वडील आणि मुलगा यांना कोरोनाची लागण झाली असून धारावीतील कोरोनाग्रस्तांची संख्या ७ वर गेली आहे. जरम्यान, मुलाचे वय ४९ आणि वडीलांचे वय ८० आहे. बलिगा नगरमध्ये हे दोन रुग्ण आढळले असून पोलीसांनी हा भाग सील केला आहे.

या आधी बलिगा नगरमध्ये १ रुग्ण आढळला होता पण त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आता पुन्हा त्याच भागात रुग्ण आढळल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आणखी पसरत चालले आहे. हे दोघे कोणाकोणाच्या संपर्कात आले त्यांचा शोध सुरु असून लवकरात लवकर या कोरोनाच्या संकटाला आळा कसा घालता येईल याकडे आरोग्यविभाग, सरकार अथक प्रयत्न करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाची संख्या कमी होत असताना अशी मागणी करणं हे षडयंत्र तर नाही ना?

News Desk

गुप्तेश्वर पांडे वरिष्ठ अधिकारी होते मात्र भाजपचे नेते असल्यासारखे बोलत होते, गृहमंत्र्यांचा टोला

News Desk

आपलं सरकार असतानाही जर अन्याय होत असेल तर रस्त्यावर उतरा… काँग्रेसचा सल्ला

News Desk