HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या ब्रिजभूषणवर देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई | “रामाच्या दर्शनासाठी कोण जात असेल. तर कोणाला रामाच्या दर्शनापासून कोणाला रोखू नये,” अशी भूमिका विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्याला जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी आज (१० मे) नंदिनीनगर येथे जाहीर सभा घेण्यात आली होती. या सभेत राज ठाकरेंनी अयोध्येत पाऊल ठेवण्याआधी उत्तर भारतीयांची माफी मागावी. माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंनी यूपीमध्ये प्रवेश करून नये. राज ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखण्यासाठी ५ लाख लोक जमवणा, अशी भूमिका ब्रिजभूषण सिंहांनी त्यांनी घेतली आहे.

 राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला होणाऱ्या विरोधावर पत्रकारांनी प्रश्नवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या विरोध करण्याचे ब्रिजभूषण यांचे काय कारण आहे, हे मला माहिती नाही. माझे त्यांच्याशी बोलणे झालेले नाही. माझे एक स्पष्ट मत आहे की, रामाच्या दर्शनासाठी कोण जात असेल. तर त्यांना रामाच्या दर्शनापासून कोणाला रोखू नये. कोणाला विरोध करण्याचे कारण नाही. मला ब्रिजभूषण यांच्याशी चर्चा करण्याची काही अवश्यकता नाही.”

ब्रिजभूषण सिहा यांच्या मनधरणीसाठी शाहनवाज हुसेन यांनी घेतली भेट 

 राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोधाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेता शाहनवाज हुसेन हे त्यांच्या मनधरणीसाठी पुढे सरसावले आहेत. शाहनवाज हुसेन यांनी ब्रिजभूषण यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान ब्रिजभूषण यांची राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याविरोधावरून शाहनवाज हुसेन यांनी चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. परंतु, माध्यमांशी शाहनवाज हुसेन यांना विचारल्यावर ते म्हणाले, “मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आलो. मला याबद्दल काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.”  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता धवलसिंह मोहिते पाटील कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार

News Desk

भीमा-कोरेगाव परिसरात काही संघटनांनी वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला

News Desk

संजय राठोड जगदंबा मातेच्या मंदिरात, पोहरादेवीत प्रचंड गर्दी, पोलिसांचा लाठीमार

News Desk