HW News Marathi
महाराष्ट्र

लोकचळवळ आणि लोकांच्या योगदानामुलेच जलयुक्त शिवार यशस्वी – खोतकर

नांदेड :- पावसाने दिलेली साथ आणि जलयुक्त शिवार अभियानासारख्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे नांदेड जिल्ह्यात चांगले पाणीसाठे निर्माण करता आले आहेत. जलयुक्त शिवार अभियान हे लोकचळवळ व जिल्हावासीयांनी दिलेल्या योगदानामुळेच यशस्वी झाले आणि दिलेले हे सर्वांचे योगदान निश्चितच गौरवास्पद आहे. असे गाैरवोद्गार राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज येथे व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५७ व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते झाले. ध्वजवंदनानंतर संदेशपर त्यांचे भाषण झाले. पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर शानदार संचलनासह उत्साहात हा समारंभ संपन्न झाला. या समारंभासाठी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, विविध क्षेत्रातील मान्यवरांसह राजकिय पदाधिकारी व अधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

उपस्थित जि. प.अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार-जवळगावकर, नांदेड च्या महापौर सौ. शैलजा स्वामी, आ. हेमंत पाटील, जि. प.उपाध्यक्ष समाधान जाधव, विशेष पोलीस महानिरिक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील आदींसह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी, आदींचा समावेश होता.महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा संदेश देतांना पालकमंत्री अर्जुन खोतकर पुढे म्हणाले की,विकास कामांत प्रत्येकांनी आपापले हेवेदावे व राजकारण आडवे न आणता नांदेडच्या विकासाच्या अमर्याद संधीना गवसणी घालण्यासाठी एकदिलाने प्रयत्न करू या,तसेच आगामी खरीप हंगामात ७ लाख ७२ हजार ५७५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षीत आहे. त्यासाठी बियाणे, खते पुरेशी उपलब्ध व्हावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. पीक पद्धतीत सुनियोजित बदलाबाबतही आता शेतकरी बांधवांनी जागरूक रहावे लागेल. यातूनच शेतीपूरक उद्योग आणि शेतीला पशूपालन व्यवसायाचीही जोड मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठीही प्रयत्न सुरु आहे. त्याअंतर्गतच सुरु असलेल्या ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ मोहिमेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. विष्णुपूरी प्रकल्पाचे थकीत चाळीस कोटींचे वीज बील माफ करून सिंचनासाठी पाण्याच्या दोन पाळ्या देण्यात आल्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

पालकमंत्री खोतकर यांनी जिल्ह्यातील विविध उपक्रमांचा गौरवाने उल्लेख केला. त्यामध्ये कॅशलेस व्यवहारासाठीचा डिजीधन मेळावा, पुरवठा विभागाची पीडीएमएमएस प्रणाली, उज्ज्वल नांदेड उपक्रम तसेच शहर सौंदर्यीकरणासाठीच्या आमदार हेमंत पाटील यांच्या बोलक्या भितींच्या उपक्रमाचा तसेच नांदेडहून सुरु झालेल्या पुर्ववत विमान सेवा यांचा समावेश होता. ते म्हणाले की, शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी रस्त्यांचे सदृढ जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्याअंतर्गत पश्चिम नांदेडमध्ये रेल्वे ओव्हरब्रीजचा प्रकल्प महत्त्वपुर्ण ठरेल. नांदेड जिल्ह्यात कृषी, औद्योगीक, पर्यटन अशा अनेकविध क्षेत्रात विकासाच्या अमर्याद संधी आहेत. त्यांना गवसणी घालण्यासाठी आपल्या सर्वांना एकदिलाने काम करण्याची गरज आहे. जलयुक्त शिवार अभियानातील जिल्ह्यातील कामांसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील दानशूर घटकांनी पुढे यावे , असे आवाहनही खोतकर यांनी यावेळी केले.

समारंभात सुरवातीला पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले, तसेच राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. पालकमंत्री खोतकर यांनी संचलन पथकांचे निरीक्षणही केले. परेड कमांडर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील आणि सेकंड परेड कमांडर पोलीस उपनिरीक्षक शामराव राठोड यांच्या नेतृत्वात सशस्त्र पोलीस पथकाच्या तीन प्लाटूनसह, महिला पोलीसांचे पथक, जलद कृती दल, शहर वाहतूक शाखा, गृहरक्षक दलाच्या पुरूष व महिलांचे पथक, अग्नीशमन दल, पोलीस वाद्यवृंद, श्वान पथक, बॅाम्ब शोधक व नाशक पथक, मार्क्स मॅन, वज्र वाहन, अग्नीशमन दल, बुलेट रायडर संचलनात सहभागी झाले. पालकमंत्री खकर यांनी उपस्थित स्वातंत्र्यसेनानी यांच्याशीही साधला, तसेच त्यांची आस्थेवाईक विचारपूस करून, त्यांना शुभेच्छाही दिल्या.तर व्यंकटेश चौधरी यांनी या सोहळ्याचे सुत्रसंचालन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी मिळणार

News Desk

वीज कामगारांचे प्रश्न मार्गी लागणार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले वीज कर्मचारी संघटनांना आश्वासन

News Desk

“इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब…”,अमृता फडणवीसांचा शायरीतून सरकारला टोला

News Desk