नवी दिल्ली | निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना पुढील आदेशापर्यंत फाशीला स्थगिती देण्यात आली आहे. दिल्ली पटियाला हाऊस न्यायालयाने निर्णयाने पुन्हा एकदा निर्भयाच्या नराधमाची फाशी लांबणीवर केली आहे. निर्भयाच्या ४ दोषीपैकी एक पवन गुप्ता यांची क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने आज (२ मार्च) फेटाळून लावली आहे. दोषी पवनने याचिकेत म्हटले की, घटनावेळी अल्पवयीन असल्याचा दावा त्यांनी केला होता. आणि फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रुपांतर करवे, अशी विनंती त्यांनी केली होती.
2012 Delhi gang-rape case: A Delhi Court has deferred the matter as the mercy petition of one of the convicts, Pawan is pending before the President of India https://t.co/rwEpu1VLWk
— ANI (@ANI) March 2, 2020
दरम्यान, यावर आज झालेल्या सुनावणीत पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने सर्वसंमतीने पवन गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका फेटाळली. यानंतर आता पवनकडे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका दाखल करण्याचा अजून एक पर्याय उपलब्ध होता. पवनने राष्ट्रपतींकडे पाठविलेली दया याचिका फेटाळून लावली आहे. यानंतर निर्भयाच्या दोषींना न्यायालयाच्या निर्णयानुसार उद्या (३ मार्च) फाशीवर लढकविण्याच्या मार्गावर शिक्कामोर्तब निश्चित झाले होता. मात्र, पुन्हा एकदा निर्भयाच्या चारही दोषींना पुढील आदेशापर्यंत फाशीला स्थगिती देण्यात आली आहे. दिल्ली पटियाला हाऊस न्यायालयाने निर्णयाने पुन्हा एकदा निर्भयाच्या निराधमाची फाशी लांबणीवर केली आहे.
Asha Devi, mother of 2012 Delhi gang-rape victim: Why is the court taking so much time to execute its own order to hang the convicts? Repeated postponing of the execution shows the failure of our system. Our entire system supports criminals. pic.twitter.com/JFmU1qSU46
— ANI (@ANI) March 2, 2020
न्यायालय दोषींना फाशी देण्याच्या स्वत: च्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी इतका वेळ का घेत आहे? असा सवाल निर्भयाची आई आशा देवीने उपस्थित केला आहे. तसेच न्यायालय फाशीची शिक्षेची अंमलबजावणी पुढे ढकलत जात आहे. दोषींवर योग्यवेळी कारवाई होत नाही, हा आपल्या सिस्टमचे अपयशाचे दर्शन घडवित असून देशाची न्यायव्यवस्था संपूर्णपणे गुन्हेगारांना समर्थन देत आहे, असे म्हणत निर्भयाच्या आईने दोषींच्या फाशीच्या स्थगितीवरून न्याय व्यवस्थेवर टीका केली आहे.
पवनची क्युरेटिव्ह पिटिशन न्यायालयाने फेटाळली
न्यायमूर्ती एन. व्ही. रमन्ना, न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती रोहिंग्टन फली नरीमन, न्यायमूर्ती आर भानुमती आणि न्यायमूर्ती अशोक भूषण या पाच न्यायाशीशांच्या खंडपीठासमोर पवन गुप्ताच्या क्युरेटिव्ह पिटिशनची सुनावणी झाली. आणि या पाचही न्यायाधीशांनी एकमताने त्यांची याचिका फेटाळून लावली.
निर्भयाच्या दोषींची लांबणीवर केलेल्या तारखा
निर्भया प्रकरणात यापूर्वी पटियाला हाऊस न्यायालयाने २२ जानेवारी रोजी डेथ वॉरंट जारी केले होते. यानंतर पुन्हा एकदा १ फेब्रुवारी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाणार होती. परंतु, न्यायालयाने ३१ जानेवारी रोजी एका याचिकेवर सुनावणी करताना या शिक्षेची अंमलबजावणी थांबविली होती. न्यायालयाने आतापर्यंत जारी केलेले हे तिसरे डेथ वॉरंट आहे. न्यायालयाने १७ फेब्रुवारी रोजी या प्रकरणातील तिसरे डेथ वॉरंट जारी करीत ३ मार्च रोजी सकाळी ६ वाजता फाशीची तारिख निश्चित केली आहे.
१६ डिसेंबरची ‘ती ‘ काळरात्र
१६ डिसेंबर २०१२च्या रात्री पॅरामेडिकलची विद्यार्थीनी निर्भया आणि तिचा मित्र दिल्लीतील एका मॉलमधून सिनेमा पाहून घरी परतत होते. मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते. त्या बसमध्ये आधीपासूनच चालकासह सहा जण होते. बस सुरू झाल्यावर त्या सहा जणांनी निर्भयाोसबत छेडछाड करायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्या मित्राने त्यांना विरोध केला. मात्र, आरोपींनी मित्राला बेदम मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर या सहा जणांनी निर्भयावर बसमध्येच बलात्कार केला. त्यावेळी त्यांनी तिला अत्यंत निर्घृणपणे मारहाणही केली होती. त्यामुळे निर्भया गंभीररित्या जखमी झाली होती. यानंतर आरोपींनी निर्भयाला रस्त्याकडेला फेकून दिले होते. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. जखमी निर्भयावर आधी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर तिला सिंगापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सिंगापूरमध्ये उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.