HW News Marathi
महाराष्ट्र

जागतिक आरोग्य दिवस नर्सेस आणि डॉक्टर्स यांच्या कामगिरीला समर्पित

रसिका शिंदे | आज ७ एप्रिल म्हणजे जागतिक आरोग्य दिवस. जागतिक आरोग्य संघटना ही युनोची एक विशेश शाखा आहे. ७ एप्रिल १९४८ ला या संघटनेची स्थापना झाली ज्यात १९२ देशांनी सहभाग घेतला होता. जगात विकसित आणि विकसनशील देश आहेत. या देशातील लोकांच्या आरोग्यविषयक समस्यांकडे लक्ष देणाचे काम ही संघटना करते. कोणत्याही रोगावरील उपाय हा केवळ औषधेच नसतो तर मानसिक स्वास्थ्य ही तितकेच महत्त्वाचे असते.

या जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी लोकांमध्ये रोगाविषयी जनजागृती करणे, वैद्यकीय सेवा पुरवणे, लोकांना आरोग्यविषयक सोयीसुविधा याबद्दल माहिती सांगणे या सारखी अनेक कामे या संघटनेमार्फत केली जातात. दरम्यान, या संघटनेचा स्थापना दिवस हा जागतिक आरोग्य दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. दरवर्षी आरोग्य क्षेत्राशी निगडीत एका खास संकल्पनेवर, वैश्विक समस्या किंवा मुद्द्यावर आरोग्य दिनाची थीम असते. त्यासाठी पुढील वर्षभर काम केले जाते. यंदा रूग्णसेवेतील अविभाज्य घटक असलेल्या नर्स आणि सुईणबाई यांच्यासाठी आहे.

या वर्षी मानवाचे कोरोनाशी हे War Vs Virus सुरू असताना युद्धभूमीत डॉक्टर आणि नर्स सगळ्यात आघाडीवर लढत आहेत. त्यामुळे यंदाचा आरोग्य दिन नर्स आणि इतर मेडिकल स्टार्फ यांच्या कार्याला अर्पण करण्यात आला आहे. Support nurses and midwives या थीमवर यंदा आरोग्य दिनाचे सेलिब्रेशन होणार आहे. कोरोनाशी रात्रंदिवस डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय आपल्या जीवाची पर्वा न करता या रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर आहेत त्यांच्या या जिद्दीला खरंच सलाम आहे. या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने कोरोनापासून लवकरात लवकर कसे बाहेर पडता येईल यासाठी आरोग्य संघटनेच्या मदतीने आपण सर्व भारतीयांनी सहकार्य करुयात आणि रात्रंदिवस डॉक्टर, नर्स, आरोग्य विभागातील इतर कर्मचारी करत असलेले काम यांना सलाम करुयात आणि त्यांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करुयात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात कोविड-१९ चे सर्व निर्बंध संपुष्टात; आज मध्यरात्रीपासून निर्बंध शिथिल

News Desk

आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करा; एकनाथ शिंदेंनी पावसाळापूर्व कामांचा घेतला आढावा

Aprna

कोरोनाचं संकट असतांना अशोकरावांचे आंदोलन, हे बरोबर आहे का? संभाजीराजेंचा सवाल

News Desk