HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ९९३ वर, एकूण ६९ रुग्ण करोनामुक्त

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढ आहे. राज्यातील मुंबई शहरात कोरोनाचे प्रादुर्भाव सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत. मुंबई आज (१० एप्रिल) २१८ रुग्ण आढळून आले आहे. एका दिवसात मुंबईत कोरोनाचे १० जणांचे मृत्यू झाला आहे. यामुळे आता मुंबईतील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६४ वर पोहोचली आहे. तर ६९ जण कोरोनामुक्त होऊन घरी सोडण्यात आले आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ९९३ रुग्णांची संख्या आहे, अशी माहिती महानगरपालिकेने दिला आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसऱ्या बाजुला ६९ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे. मुंबईत आज करोना सदृष्य लक्षणे असलेले २९२ नवीन रुग्ण दाखल झाले असून अशा रुग्णांची संख्या आता ४ हजार ३५ इतकी झाला आहे.दिवसभरातील १० मृतांपैकी ९ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते, असेही पालिकेने नमूद केले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात ‘महाराष्ट्र बंद’ला हिंसक वळण

swarit

फडणवीसांनी आरक्षण दिलं आणि कोर्टातही टिकवलं मात्र राज्य सरकारला ते टिकवता आलं नाही –  शिवेंद्रराजे भोसले  

News Desk

सत्तेच्या हव्यासापोटी आंधळ्या भाजपाकडून पुन्हा मंदिराचे राजकारण !सचिन सावंत

News Desk