HW News Marathi
महाराष्ट्र

मालेगावात कोरोनाचा दुसरा बळी, आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत आणखी भर

मालेगाव | मालेगावात कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. आज (११ एप्रिल) मालेगावात २२ वर्षीय तरुणीचा कोरोनामूळे मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत मालेगावात कोरोनामूळे मृत्यू झालेल्यांची संख्यां २ आहे. दरम्यान, आज मृत्यू झालेल्या तरुणीवर धुळ्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते.

दरम्यान, काल (१० एप्रिल) मालेगावात ६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यातील एकीचा मृत्यू झाल्याने आता हा आकडा ९ वर पोहोचला आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक बाधित हे मालेगावात आढळून येत असल्याकारणाने आरोग्य यंत्रनेच्या चिंतेत भर पडली आहे. सध्या मालेगावात ९ कोरोना रुग्ण सामान्य रुग्णालयात उपचार घेत अशून ८३ जणांचे रिपोर्ट अजून यायचे बाकी आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमचं युतीबाबत ठरलंय…अन्य कोणीही त्यात तोंड घालू नये !

News Desk

संजय राठोड राजीनामा देत नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही ! भाजप आक्रमक

News Desk

रेमेडिसेव्हिर इंजेक्शनचा जळगावात मोठ्या प्रमाणात तुटवडा, लवकर पुरवठा करा – गिरीश महाजन  

News Desk