HW News Marathi
महाराष्ट्र

लॉकडाऊन असतानाही अंत्यसंस्कारासाठी गेलेली आई आणि मुलगी कोरोना पॉझिटिव्ह

बदलापूर | ठाणे जिल्ह्याच्या बदलापूरमध्ये आज (११ एप्रिल) ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात पोलिस अधिकाऱ्यांची पत्नी आणि मुलगी यांचा समावेश आहे. दरम्यान मुलीचे वय हे २० वर्षे आहे. देशात लॉकडाऊन असतानाही साताऱ्यात नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेले हे कुटुंब तेथील कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने त्यांना लागण झाली असल्याची माहिती बदलापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिली आहे.

तर, बदलापूरात राहणाऱ्या वॉकहार्ट हॉस्पीटलच्या एका कर्मचाऱ्यालाही लागण झाली आहे. या तीनही पॉझिटिव्ह रुग्णांना बदलापूर पालिकेच्या क्वॉरंटाईन सेंटरमद्ये ठेवण्यात आले असून लवकरच त्यांना उल्हासनगरच्या कोव्हीड स्पेशल हॉस्पिटलमध्ये दाखल करम्यात येणार असल्याची माहितीही मुख्याधिकाऱ्यांनी दिली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रत्नागिरीत १९ पैकी १४ जण कोरोना निगेटिव्ह तर ५ जण स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह

swarit

माझ्या भाषणाचा विपर्यास झाला! प्रसाद लाड यांचं ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण

News Desk

डिजीटल स्त्री शक्ती- राज्य महिला आयोगाचा उपक्रम, ५००० तरुणी होणार ‘सायबर सखी’

News Desk