HW Marathi
महाराष्ट्र

भीषण ! महाराष्ट्रातील २६ धरणे कोरडी

मुंबई । महाराष्ट्रात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असलेले चित्र दिसत आहे. जलसंपदा विभागाने काल (१८ मे) दिलेलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील २६ धरणांत शून्य टक्के पाणीसाठा असल्याचे म्हटले आहे. यामुळे राज्यात किती दुष्काळाची भीषणता पाहायला मिळत आहे. जलसंपदा विभागाचे प्रदेशनिहाय अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे असे सहा विभाग आहेत. या प्रत्येक विभागातील पाण्याच्या स्थितीचा आढावा जलसंपदा विभागाकडून घेण्यात आला.

औरंगाबाद विभागात  सध्या ०.४३ टक्के इतकाच पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच दिवसांत २३.४४ टक्के पाणी होते. औरंगाबाद विभागातील  बीड, हिंगोली, परभणी आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आली आहे.

या विभागात पैठण, मांजरा, माजलगांव, येलदरी, सिध्देश्‍वर, लोअर तेरणा, सीना कोलेगांव आणि धुदना या धरणांचा समावेश आहे. ही सर्व धरणे सद्यस्थितीत कोरडी आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत या धरणांमध्ये पैठण- ३४.९५ मांजरा-२१.२४, माजलगांव-१७.५ आणि लोअर तेरणा धरणात ५२.०३ टक्के पाणीसाठा होता.

बुलढाण्यातील कडकपूर्णा आणि पेंटाकली, गोसीखुर्द, दीना आणि नंद ही नागपूर विभागातील धरणे तसेच जळगांव जिल्ह्यातील अप्पर तापी हातनूर, वाकी, भाम, भावली आणि पुनेगांव ही नाशिक विभागातील व दिभे, घोड, पिंपळगांव जोगे, वडज आणि टेमघर ही पुणे विभागातील  भीमा, कुंडली-टाटा आणि लोणावळा टाटा ही सोलापूर विभागातील धरणेही कोरडीठाक झाली आहेत.

Related posts

नवजात शिशुला अज्ञात इसमाने फेकले नाल्यात

News Desk

मुख्यमंत्री महोदय टोल चालकांनाही देशभक्ती शिकवा! : सचिन सावंत

News Desk

मिरजमध्ये ‘माजी विद्यार्थी मेळाव्या’चे आयोजन

Gauri Tilekar