HW News Marathi
महाराष्ट्र

#COVID19 : राज्यातील कोरोनाबाधिताचा आकडा ६६१ वर, नव्या २६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळात आहे. सध्या राज्यात पुणे १७, पिंपरी-चिंचवड ४, अहमदनगर ३ आणि औरंगाबाद २, अशा २६ नव्या रुग्णांची नोंद आज (५ एप्रिल) झाल्याची माहिती महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. यामुळे आता राज्याच्या कोरोनाबाधितांच्या आकडा ६६१ वर येवून पोहोचला आहे. तर देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ३३७४ वर गेली आहे. राज्यात आतापर्यंत ३४ ‘कोरोना’बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, ५२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती काल (४ एप्रिल) दिली.

 

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या

  • मुंबई – ३७७
  • पुणे + पिंपरी-चिंचवड – ९९
  • सांगली -२५
  • ठाणे व इतर मनपा – ७७
  • नागपूर – १७
  • अहमदनगर – २०
  • लातूर – ८
  • बुलडाणा – ८
  • यवतमाळ – ४
  • औरंगाबाद – ७
  • सातारा – ३
  • उस्मानाबाद – ३
  • कोल्हापूर – २
  • रत्नागिरी – २
  • जळगाव – २
  • सिंधुदुर्ग – १
  • गोंदिया – १
  • नाशिक – १
  • वाशिम – १
  • अमरावती -१
  • हिंगोली – १
  • इतर राज्य – गुजरात – १

एकूण – ६६१

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंडे साहेबांपश्चात लोकांचं प्रेम तसूभरही कमी नाही – पंकजा मुंडे

News Desk

वंचित बहुजन आघाडीची ३० जुलैला उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार

News Desk

महाराष्ट्रातील नेत्यांमुळे बिहारला फायदा होईल, पण महाराष्ट्रातही शांतता नांदेल – सामना

News Desk