मुंबई। राज्यात आज कोरोनाच्या २ हजार ७०१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज (१६जून) राज्यात १ हजार ८०२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत ५७ हजार ८५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १३ हजार ४४५ इतकी झाली आहे. यापैकी ५० हजार ४४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात आज 2701कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 113445 अशी झाली आहे. आज नवीन 1802 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 57851 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 50044 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 16, 2020
राज्यात ५ लाख ८६ हजार ८६८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५४३ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ८० हजार ५०२ खाटा उपलब्ध असून सध्या २७ हजार २४२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात ८१ मृत्यू झाले आहेत. याशिवाय आज मुंबईतील ८६२ आणि उर्वरित राज्यातील ४६६ अशा एकूण १३२८ जुन्या मृत्यूंची नोंद घेण्यात येत आहे. त्यात जिल्हानिहाय आकडेवारी अशी: अहमदनगर १, अकोला १४, अमरावती ६, औरंगाबाद ३३, बुलढाणा २, धुळे १२, जळगाव ३४, जालना ४, लातूर ३, नांदेड २, नाशिक २८, उस्मानाबाद ३, पालघर ११, परभणी १, पुणे ८५, रायगड ११, रत्नागिरी १, सांगली ४, सातारा ६, सिंधुदूर्ग ३, सोलापूर ५१, ठाणे १४६, वाशिम १, यवतमाळ १ अशी एकूण ४६६. राज्याचा मृत्यूदर ४.८ झाला आहे.
आज नोंद झालेल्या ८१ मृत्यूंमध्ये मुंबई मनपा (५५), कल्याण-डोंबिवली मनपा (२), भिवंडी-निजामपूर मनपा (२), मीरा-भाईंदर मनपा (११), अहमदनगर (२), पुणे (१), पुणे मनपा (७), पिंपरी चिंचवड मनपा (१).
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.